IED स्फोटानं हादरलं जम्मू; भारताचे 2 जवान शहिद, 1 गंभीर
जम्मू-काश्मीरमधील अखनूर सेक्टरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. नियंत्रण रेषा म्हणजे LOC जवळ असलेल्या फॉरवर्ड पोस्टवर IED स्फोट झाला आहे. या स्फोटात भारतीय लष्कराचे एक कॅप्टन आणि एक जवान असे दोन जवान शहीद झाले आहेत. तर आणखी एक जवान गंभीर जखमी आहे. जखमी जवानांवर उपचार सुरू आहेत. हा स्फोट आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराचे पथक भटाल भागात नियमित गस्त घालत होते. तेव्हा IED चा भयानक स्फोट झाला. जखमी जवानांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोघांना वीरमरण आलं. स्फोट झाल्याच्या घटनेनंतर लष्कर आणि सुरक्षा दलांच्या जवानांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे. या परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
हेही वाचा - ‘बाबा मलाही पेटवून देतील’... चिमुकल्याचं अंगावर काटा आणणारं बोलणं, गंभीर गुन्हा उघडकीस
मोर्टार शेल देखील सापडला
अखनूर सेक्टर परिसरातून प्रताप कालवा जातो. या कालव्यात आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास एक मोर्टार शेल सापडला. या सेलची माहिती स्थानिक नागरिकांनी भारतीय जवानांनी दिली. तेव्हा जवांनासह बॉम्ब शोधक पथकाने घटनास्थळी धाव घेत शेल निष्क्रिय केला. यामुळे मोठी दुर्घटना टळली.
हेही वाचा - 'ही' ट्रेन गेल्या 75 वर्षांपासून देत आहे प्रवाशांना मोफत सेवा! काय आहे या रेल्वेचं नाव? जाणून घ्या
कुपवाडमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील कर्नाह भागात सुरक्षा दलांनी काल सोमवारी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला. भारतीय जवानांना या भागात शस्त्रसाठा असल्याची माहिती मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे लष्कर आणि पोलिसांनी अमरोही भागात संयुक्त शोधमोहीम राबवली. यामध्ये एक AK-47 रायफल, एक AK मॅगझिन, एक सायगा एमके रायफल, एक सायगा एमके मॅगझिन आणि 12 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.