2030 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्याचा भारताचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रकुल क्रीडा कार्यकारी मंडळाने 2030 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी भारतातील अहमदाबादला शिफारस केली आहे.
कॉमनवेल्थ स्पोर्ट्सच्या निवेदनानुसार, अहमदाबाद आता पूर्ण सदस्य राष्ट्रांना प्रस्तावित केले जाईल. 26 नोव्हेंबर 2025 रोजी ग्लासगो येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ स्पोर्ट्स जनरल असेंब्लीमध्ये अंतिम निर्णय घेतला जाईल.
हेही वाचा - ICC क्रमवारीत भारताचे वर्चस्व! जगातील टॉप-10 फलंदाजांमध्ये 9 भारतीय खेळाडूंचा समावेश
जर नोव्हेंबर 2025 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा महासभेत अहमदाबादला मान्यता मिळाली, तर 2010 मध्ये नवी दिल्लीनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणारे ते भारतातील दुसरे शहर बनेल. नायजेरियानेही 2030 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी अर्ज केला आहे.
हेही वाचा - ODI World Cup: रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणार की नाही? गौतम गंभीरने केलं धक्कादायक विधान ,म्हणाला 'त्यांचा अनुभव संघासाठी...
कॉमनवेल्थ स्पोर्ट इव्हॅल्युएशन कमिटीने केलेल्या व्यापक पुनरावलोकनानंतर ही शिफारस करण्यात आली आहे, ज्यामध्ये शहराची तांत्रिक तयारी, खेळाडूंच्या सुविधा, पायाभूत सुविधा, व्यवस्थापन आणि कॉमनवेल्थ मूल्यांशी जुळवून घेण्याचे मूल्यांकन करण्यात आले आहे.