Crime News : 325 ग्रॅम सोनं, 5 किलो चांदी आणि रोख रक्कम…; लेकीच्या लग्नाला बाहेर गावी गेलेल्या ज्वेलर्सच्या घरावर दरोडा

घर रिकामे असल्याचे पाहून गुन्हेगारांनी सुमारे 50 लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. या मोठ्या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.<br/>

Crime News : 325 ग्रॅम सोनं, 5 किलो चांदी आणि रोख रक्कम…; लेकीच्या लग्नाला बाहेर गावी गेलेल्या ज्वेलर्सच्या घरावर दरोडा

Crime News: मुलीच्या लग्नाचा आनंद साजरा करण्यासाठी संपूर्ण कुटुंब घराला कुलूप लावून बाहेर गेले, मात्र हीच संधी साधून चोरट्यांनी एका ज्वेलर्सच्या घराला आणि दुकानाला लक्ष्य केले. उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यातील एरच पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली आहे. घर रिकामे असल्याचे पाहून गुन्हेगारांनी सुमारे 50 लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. या मोठ्या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

लग्नासाठी कुटुंब छतरपूरला गेले आणि चोरट्यांनी घर लुटलं
इस्किल बुझुर्ग गावातील रहिवासी जितेंद्र सोनी हे आपल्या घरातूनच दागिन्यांचे दुकान चालवतात. त्यांच्या मुलीचे लग्न मध्य प्रदेशातील छतरपूर येथे आयोजित करण्यात आले होते. लग्न समारंभ 9 मार्च रोजी असल्याने, संपूर्ण कुटुंब 9 मार्च रोजी सकाळी 10 वाजता घराला कुलूप लावून निघाले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी शेजाऱ्यांना घराचे मुख्य गेट उघडे दिसले. त्यांनी तातडीने जितेंद्र सोनी यांना फोन करून माहिती दिली. कुटुंबाने परत येऊन पाहिले असता घरातील कपाटे उघडी होती आणि दुकानातील मौल्यवान दागिने गायब होते.

325 ग्रॅम सोने आणि 5 किलो चांदी लंपास
चोरट्यांनी घर आणि दुकान अशा दोन्ही ठिकाणची पूर्णपणे तोडफोड केली आहे. कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी दुकानातून 52 ग्रॅम सोने, 2 किलो चांदी आणि 35,000 रुपये रोख चोरले. तसेच घराच्या आतून 273 ग्रॅम सोन्याचे दागिने, 3 किलो चांदी आणि 50,000 रुपये रोख रक्कम पळवून नेली. एकूणच, चोरटे 325 ग्रॅम सोने, 5 किलो चांदी आणि रोख रक्कम घेऊन पसार झाले आहेत. या सर्व मालाची किंमत सुमारे 50 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

रेकी करून रात्रीच्या सुमारास टाकला दरोडा
घटनेचा तपास करताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, 9 मार्च रोजी जेव्हा कुटुंब लग्नासाठी कारने निघून गेले, तेव्हा दोन दुचाकींवरून तीन तरुण घराभोवती फिरताना दिसले. चोरट्यांनी दिवसा घराची रेकी केली आणि त्यानंतर पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास घरात घुसून चोरी केली. पुरावे नष्ट करण्यासाठी चोरांनी घरातील काही सीसीटीव्ही कॅमेरेही तोडले आहेत.

हेही वाचा – Crime News: ‘या मुली माझी बदनामी करत होत्या, माझ्या आईवडिलांना मारणार होते’; 19 वर्षीय पायलनं आरोप करत संपवलं जीवन

पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज जप्त; तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच एरच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घरातील आणि बाहेरचे सीसीटीव्ही डीव्हीआर (DVR) जप्त केले आहेत. अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजमधील संशयितांच्या आधारे पोलिसांचे पथक आरोपींचा शोध घेत आहे. "आम्ही पुराव्यांची तपासणी करत आहोत आणि लवकरच आरोपींना अटक केली जाईल," असा दावा पोलीस प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number