Income Tax Raid : 36 गाड्या, 150 जवान अन् 30 तास झडती…’या’ बड्या व्यावसायिकाच्या घरावर मोठी धाड

या धाडीत जप्त करण्यात आलेला ऐवज पाहून अधिकाऱ्यांच्याही भुवया उंचावल्या आहेत. तिजोरीतून कोट्यवधींची रोकड हस्तगत करण्यात आली.

Income Tax Raid : 36 गाड्या, 150 जवान अन् 30 तास झडती…’या’ बड्या व्यावसायिकाच्या घरावर मोठी धाड

Income Tax Raid : भारत-नेपाळ सीमेवरील रक्सौल शहरात शुक्रवारी पहाटे 6 वाजता जेव्हा 36 गाड्यांचा ताफा आणि दीडशे सशस्त्र जवानांनी एन्ट्री केली, तेव्हा संपूर्ण शहर हादरून गेले. रक्सौलचे दिग्गज व्यावसायिक आणि तनिष्क शोरूमचे मालक मोहम्मद कलीम यांच्यावर आयकर विभाग (IT) आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ED) संयुक्तरीत्या इतिहासातील सर्वात मोठी रेड टाकली आहे. गेल्या 30 तासांपासून अधिक काळ ही कारवाई अद्यापही सुरूच आहे.

गुप्त मोहीम आणि 30 तासांची झडती 

मोहम्मद कलीम हे केवळ तनिष्क शोरूमचेच नव्हे, तर हिरो एजन्सीचेही मालक आहेत. तपास यंत्रणा मागील सहा महिन्यांपासून त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर गुप्तपणे पाळत ठेवून होत्या. एका महिला संचालक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली ही हाय-प्रोफाइल मोहीम राबवण्यात आली. कलीम यांच्या निवासस्थानासह, त्यांच्या नातेवाईकांच्या जागा आणि चार्टर्ड अकाउंटंटच्या (CA) घराचीही झाडाझडती घेतली जात आहे.

हेही वाचा – Paddy Scam : बापरे! उंदरांनी खाल्ले 8 कोटींचे तांदूळ? 'या' राज्यातील सरकारी गोदामातून 26,000 क्विंटल तांदूळ गायब

तिजोरी उघडली आणि अधिकारी चक्रावले 

प्राप्त माहितीनुसार, या धाडीत जप्त करण्यात आलेला ऐवज पाहून अधिकाऱ्यांच्याही भुवया उंचावल्या आहेत. तिजोरीतून कोट्यवधींची रोकड हस्तगत करण्यात आली असून, धक्कादायक बाब म्हणजे यात 2 हजार रुपयांच्या जुन्या नोटांचे पुडकेही सापडले आहेत. रोख रकमेसोबतच मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने आणि बेनामी मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांतून परदेशातील व्यवहारांचा संशय व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा –  Viral Story : उंदीर मारण्याचं औषध मागवलं…पण डिलीव्हरी बॉयच्या 'या' कृत्यामुळे वाचला महिलेचा जीव

शहराला 'छावणी'चे स्वरूप

कारवाईचे गांभीर्य पाहून स्थानिक पोलिसांच्या जागी आता एसएसबी (SSB) जवानांनी ताबा घेतला आहे. कलीम यांच्या घराबाहेर आणि व्यवसायांच्या ठिकाणी जवानांचा सशस्त्र पहारा असून, रक्सौलच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी प्रदीर्घ आणि भव्य कारवाई होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. अद्याप मोजदाद सुरू आहे. सर्व व्यवहार आणि जप्त केलेली रोकड यांचा ताळमेळ बसल्यानंतरच अधिकृत आकडेवारी जाहीर केली जाईल, असं आयकर विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितलं आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number