Tuesday, November 18, 2025 10:20:03 PM

वैद्यकीय क्षेत्रात होणार मोठा बदल! डॉक्टर बनण्यासाठी NEET नव्हे तर NExT परीक्षा द्यावी लागणार?

ही नवी परीक्षा देशातील डॉक्टर बनण्याची, परवाना मिळविण्याची आणि पदव्युत्तर शिक्षणात प्रवेश घेण्याची एकमेव अट ठरणार आहे.

वैद्यकीय क्षेत्रात होणार मोठा बदल डॉक्टर बनण्यासाठी   neet नव्हे तर next परीक्षा द्यावी लागणार

NExT Exam: भारतातील वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेत एक मोठा बदल घडणार आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) जाहीर केले आहे की लवकरच NEET-PG परीक्षा रद्द करून तिच्या जागी NExT (National Exit Test) लागू केली जाईल. ही नवी परीक्षा देशातील डॉक्टर बनण्याची, परवाना मिळविण्याची आणि पदव्युत्तर शिक्षणात प्रवेश घेण्याची एकमेव अट ठरणार आहे. यामुळे वैद्यकीय शिक्षणाची संपूर्ण रचना आणि मूल्यांकन प्रणाली बदलणार आहे.

काय बदल होणार?

आतापर्यंत वैद्यकीय पदवी मिळविण्यासाठी आणि PG प्रवेशासाठी NEET-PG परीक्षा आवश्यक होती. मात्र, NExT लागू झाल्यानंतर ही सर्व प्रक्रिया एका एकसंध परीक्षेत रूपांतरित होईल. MBBS विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्यासाठी NExT उत्तीर्ण करणे आवश्यक असेल. ही परीक्षा वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी परवाना देईल. तसेच ही परीक्षा पदव्युत्तर प्रवेश (PG Admission) देखील याच गुणांवर आधारित असेल. NMC च्या मते, या परीक्षेमुळे देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे समान पातळीवर मूल्यांकन होईल आणि डॉक्टरांच्या गुणवत्तेत वाढ होईल.

हेही वाचा - Stenographer Recruitment: मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर भरती; 1.77 लाखांपर्यंत मिळणार पगार

दरम्यान, NExT परीक्षा ऑगस्ट 2025 पासून लागू करण्याची योजना होती, परंतु आता ती पुढे ढकलली गेली आहे. NMC च्या मते, परीक्षेची रचना, तयारी आणि विद्यार्थ्यांचा अभिप्राय लक्षात घेऊन पुढील 3 ते 4 वर्षांत मॉक टेस्ट घेण्यात येतील. या ट्रायल परीक्षा वास्तवात NExT प्रणाली किती प्रभावी आहे, हे तपासतील. या मॉक टेस्टचा संपूर्ण खर्च NMC उचलणार आहे.

हेही वाचा - Maharashtra Police Recruitment : राज्यात पोलीस भरती; 30 नोव्हेंबरपर्यंत करता येईल ऑनलाईन अर्ज

विद्यार्थ्यांचा विरोध

2019 पासून NExT बाबत विद्यार्थी आणि डॉक्टर संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यांचा युक्तिवाद असा आहे की, ही परीक्षा NMC कायदा 2019 च्या तरतुदींना विरोध करते आणि विद्यार्थ्यांवर अतिरिक्त मानसिक व शैक्षणिक दबाव आणेल. त्यामुळे सरकारने तिची अंमलबजावणी सध्या स्थगित ठेवली आहे.

ExT लागू झाल्यावर काय बदल होणार?

जर NExT परीक्षा लागू झाली तर NEET-PG, FMGE, आणि MBBS अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या जातील. MBBS विद्यार्थ्यांना अंतिम वर्षात NExT परीक्षा द्यावी लागेल. PG प्रवेश केवळ NExT मधील गुणवत्तेवर दिला जाईल. परदेशातून वैद्यकीय पदवी घेतलेले विद्यार्थीही स्वतंत्र FMGE न देता NExT द्वारे परवाना मिळवू शकतील.

वैद्यकीय शिक्षणात नवा अध्याय

NExT परीक्षा ही भारतातील वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रातील सर्वात मोठी संरचनात्मक सुधारणा ठरू शकते. एकच परीक्षा, एकसंध मूल्यांकन प्रणाली आणि पारदर्शक परवाना प्रक्रिया यामुळे वैद्यकीय शिक्षणात स्थिरता येईल, असे NMC चे म्हणणे आहे. मात्र, विद्यार्थी आणि डॉक्टर संघटनांच्या चिंतेमुळे या परिवर्तनाला अद्याप काही अडथळे आहेत.
 


सम्बन्धित सामग्री