Crime News: 36 वर्षीय सुनेने 21 वर्षीय प्रियकराच्या मदतीने अनैतिक संबंधांत अडथळा ठरणाऱ्या सासूला संपवलं; CCTV मुळे ‘असं’ फुटलं सुनेचं बिंग

आपल्या 21 वर्षीय प्रियकरासोबत असलेल्या अनैतिक संबंधांना सासूचा विरोध असल्याने, 36 वर्षीय सुनेने प्रियकराच्या साथीने 69 वर्षीय सासूला संपवलं.

Crime News: 36 वर्षीय सुनेने 21 वर्षीय प्रियकराच्या मदतीने अनैतिक संबंधांत अडथळा ठरणाऱ्या सासूला संपवलं; CCTV मुळे ‘असं’ फुटलं सुनेचं बिंग

Crime News: उत्तर प्रदेशातील लखनौ येथील 'महानगर' परिसरात एक अत्यंत खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आपल्या 21 वर्षीय प्रियकरासोबत असलेल्या अनैतिक संबंधांना सासूचा विरोध असल्याने, 36 वर्षीय सुनेने प्रियकराच्या साथीने 69 वर्षीय सासूला संपवलं. हत्येनंतर चोरीचा बनाव रचणाऱ्या सुनेचा डाव पोलिसांनी सीसीटीव्ही आणि श्वानपथकाच्या मदतीने उधळून लावला आहे.

दोरीने हात-पाय बांधून गळा आवळला
मिळालेल्या माहितीनुसार, निर्मला देवी (69) यांना त्यांच्याच घरात संपवण्यात आलं. आरोपी सून रंजना वर्मा हिने तिचा प्रियकर राजन शर्मा याच्या मदतीने सासूचे हात-पाय दोरीने बांधले आणि त्यानंतर गळा आवळून त्यांचा जीव घेतला. हत्येनंतर घरात चोरी झाली असून चोरट्यांनी सासूला मारले, असा बनाव रंजनाने रचला होता. मात्र, घराची अवस्था पाहून पोलिसांना पहिल्यापासूनच संशय होता.

CCTV बंद करण्याचे 'बटण' ठरले पुरावा
पोलिसांनी घराची तपासणी केली असता, दुपारी 2:00 ते 4:00 या वेळेत घरातील सीसीटीव्ही कॅमेरे मुद्दाम बंद करण्यात आल्याचे समोर आले. घराबाहेरील कॅमेऱ्यात रंजना आणि राजन एकत्र बाहेर पडताना दिसले. विशेष म्हणजे, गुन्ह्यानंतर संशय टाळण्यासाठी त्यांनी मोबाईल ॲपवरून पुन्हा कॅमेरे चालू केले होते. मात्र, हीच चतुराई त्यांच्या अंगाशी आली. तांत्रिक तपासात कॅमेरा बंद केल्याचे सिद्ध झाल्याने पोलिसांचा संशय बळावला.

अनैतिक संबंध आणि सासूचा विरोध
तपासात असे समोर आले की, रंजना आणि राजन यांचे गेल्या 4 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. राजन त्याच इमारतीत भाडेकरू म्हणून राहत होता. सासू निर्मला देवी यांचा या संबंधांना तीव्र विरोध होता, ज्यावरून घरात वारंवार वाद होत असत. शनिवारी जेव्हा पती त्रिदेश वर्मा कामावर आणि मुलगा आदित्य बाहेर गेला होता, तेव्हा रंजनाने ही संधी साधून सासूचा काटा काढला.

स्निफर डॉगने पकडले गुपित
घटनेनंतर रंजनाने रडण्याचे नाटक केले, पण पोलीस श्वानपथक (स्निफर डॉग) घटनास्थळी येताच चित्र पालटले. वासाचा मागोवा घेत पोलीस कुत्रा थेट प्रियकर राजन शर्माकडे जाऊन थांबला. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच राजनने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यानंतर रंजनाचा खोटेपणाही उघड झाला.

हेही वाचा – Ashok Kharat Case: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात आता 'इन्कम टॅक्स'च्या रडारवर! 52 सातबारा उतारे अन् कोट्यवधींची मालमत्ता उघड

विश्वासघाताने कुटुंब उद्ध्वस्त
निर्मला देवी यांचे पती सचिवालयातील निवृत्त कर्मचारी होते, त्यांचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले होते. ज्या सुनेने घराची जबाबदारी सांभाळणे अपेक्षित होते, तिनेच प्रियकरासाठी सासूची हत्या केल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी सून रंजना वर्मा आणि तिचा प्रियकर राजन शर्मा यांना अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number