लखनऊ : लखनऊमधील श्री राम जन्मभूमी मंदिराच्या उभारणीसाठी दान करण्यात आलेली 4 किलो वजनाची चांदीची वीट कथितरीत्या गायब झाल्याबाबत शिवसेना (उबाठा) च्या उत्तर प्रदेश शाखेने संशय व्यक्त केला आहे. यासंदर्भात, शिवसेना (उबाठा) चे राज्य प्रमुख ठाकूर अनिल सिंग यांनी सरोजिनी नगर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली असून, IGRS पोर्टलद्वारेही आपली कैफियत मांडली आहे. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
ठाकूर अनिल सिंह यांनी सांगितले की, शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी यापूर्वी श्री राम जन्मभूमी मंदिराच्या उभारणीसाठी 1 कोटी रुपयांचा धनादेश देणगी म्हणून दिला होता. तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली हजारो शिवसैनिक आणि साधू-संतांच्या उपस्थितीत मंदिर ट्रस्टला 4 किलो वजनाची चांदीची वीट अर्पण करण्यात आली होती. त्यांनी आरोप केला की, संबंधित चांदीच्या विटेची कोणतीही पावती मंदिर विश्वस्त मंडळाकडून अद्याप देण्यात आलेली नाही. मंदिर परिसराला दान करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांचे दागिने आणि इतर वस्तूंच्या बाबतीत कथित अनियमितता पाहता, शिवसेनातर्फे देण्यात आलेली चांदीची वीटही चोरी किंवा अफरातफरीची बळी ठरू शकते, अशी भीती सिंग यांनी व्यक्त केली.
त्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. ठाकूर अनिल सिंग यांनी असेही सांगितले की, ते या मुद्द्याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेतील. या भेटीदरम्यान ते विटांच्या पावत्या उपलब्ध करून देण्याची आणि प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करतील. तसेच, जर विटा गायब झाल्या असतील किंवा त्यांची चोरी झाली असेल, तर आरोपींविरुद्ध अधिकृत तक्रार दाखल करण्यासह योग्य ती कारवाई करण्याचीही ते मागणी करतील.
काय म्हणाले संजय राऊत –
अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेने दान केलेली 4 किलो वजनाची चांदीची वीट बेपत्ता झाल्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी हजारो शिवसैनिक आणि साधू-संतांच्या उपस्थितीत 1 कोटी रुपये आणि ही पवित्र चांदीची वीट सढळ हाताने दान केली होती. तरीही, इतकी वर्षे उलटूनही ट्रस्टकडून त्याबाबत कोणतीही पावती किंवा माहिती मिळालेली नाही. ती वीट नक्की कुठे गेली? आता या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आली आहे!
“Serious questions over the missing 4 kg silver brick donated by Shiv Sena for the Ram Mandir construction in Ayodhya.
Uddhav Thackeray ji had generously contributed ₹1 crore + this sacred silver brick in the presence of thousands of Shiv Sainiks & saints. Yet, years later, no… pic.twitter.com/fy1HoTTg3n — Sanjay Raut (@rautsanjay61) June 26, 2026