Massive Fire At Hospital : दिल्लीतील हॉटेलनंतर बिहारमध्ये रुग्णालयाला भीषण आग; 10 जणांचा होरपळून मृत्यू, 20 जण जखमी

देशात अनेक ठिकाणी अपघाताच्या घटनांची साखळी पाहायला मिळत आहे. दिल्लीमधील हॉटेलला आग लागल्याची घटना ताजी असताना बिहारमध्ये एका हॉस्पिटलला भीषण आग लागली.

Massive Fire At Hospital : दिल्लीतील हॉटेलनंतर बिहारमध्ये रुग्णालयाला भीषण आग; 10 जणांचा होरपळून मृत्यू, 20 जण जखमी

देशात अनेक ठिकाणी अपघाताच्या घटनांची साखळी पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील घटत असलेले अपघात ताजे असताना नुकतीच बुधवारी दिल्लीच्या मालवीय नगर येथील एका हॉटेलला भीषण आग लागली. यात 20 पेक्षा जास्त लोकांचा आगीत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. अस असताना आज सकाळी बिहारमध्ये एक दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. आज गुरुवारी 4 जून रोजी पहाटे 3 च्या सुमारास बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरा भागात असलेल्या ‘प्रसाद हॉस्पिटल’मध्ये भीषण आग लागली.

हेही वाचा- Delhi Restaurant Fire: मध्यरात्री थरार! दिल्लीतल्या प्रसिद्ध रेस्टॉरंटला भीषण आग; अनेक जणांचा होरपळून मृत्यू

आग लागलेली पाहताच रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णांना वाऱ्यावर सोडून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढला. त्यामुळे या आगीत होरपळून 10 जणांचा मृत्यू झाला तसेच 15 ते 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही आग रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरील आयसीयूमध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्रथमिक माहिती आहे. ज्यावेळेस घटनेची माहिती मिळाली त्यावेळेस तत्काळ अग्निशामक दलाच्या तब्बल 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाले.

त्यावेळी आगीच्या ज्वाळा आणि दाट काळा धूऱ्याने संपूर्ण रुग्णालयाला वेळखा घातला होता. ज्यामुळे रुग्णालयातील परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. आत असलेले रुग्ण धुराच्या लोटाने गुदमरु लागले होते. हे पाहताच अग्निशामक दलाच्या जवानांनी खिडक्या आणि दरवाजे तोडून आयसीयू आणि इतर वार्डात अडकलेल्या रुग्णांना बाहेर काढण्यात शर्थीचे प्रयत्न केले. यादरम्यान 20 पेक्षा जास्त रुग्णांना बाहेर काढून त्यांना उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number