PM Modi Visit at Ahmedabad Plane Crash site
PM Modi X Post
अहमदाबाद: अहमदाबादमधील विमान अपघातामुळे संपूर्ण देश हळहळला आहे. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमधील विमान अपघातस्थळी भेट दिली. पंतप्रधानांनी येथे त्यांनी अपघातस्थळाची पाहणी केली. त्यांनी या अपघातात जखमी झालेल्या लोकांचीही भेट घेतली. यानंतर पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक भावनिक पोस्ट शेअर करून दु:ख व्यक्त केलं. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये घटनास्थळावरील विध्वंसाचे काही फोटो शेअर केले आहेत.
पंतप्रधान मोदींनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'आज अहमदाबादमधील अपघातस्थळाला भेट दिली. विध्वंसाचे दृश्य दुःखद आहे. घटनेनंतर अथक परिश्रम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि पथकांना भेटलो. या अकल्पनीय दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल आमच्या संवेदना आहेत.'
हेही वाचा - Ahmedabad Plane Crash: बदलापूरमधील क्रू मेंबर दीपक पाठकचा दुर्दैवी मृत्यू
दरम्यान, गुरुवारी अहमदाबादमधील निवासी भागात एअर इंडियाचे विमान कोसळले. या विमानात एकून 242 प्रवासी होते. हे ड्रीमलाइनर विमान लंडनला रवाना झाले होते. परंतु उड्डाण करताचं काही सेकंदात ते कोसळले. तथापि, गुरुवारी अमित शाहा यांनी अपघातस्थळाला भेट दिली होती. तसेच आज पंतप्रधानांनी अपघातस्थळी भेट दिली. त्यांना अधिकाऱ्यांनी त्यांना परिस्थितीची माहिती दिली. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींसोबत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरापु, राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा - सकाळी 11 वाजता शेवटचा कॉल अन्...एअर होस्टेस मैथिली पाटीलचा विमान अपघातात मृत्यू
पंतप्रधान मोदींनी घेतली जखमींची भेट -
याशिवाय, पंतप्रधान मोदींनी अपघातात जखमी झालेल्यांची अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भेट घेतली. येथे त्यांनी जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांच्याशी संवाद साधला. तथापि, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी विमान अपघाताबाबत अहमदाबाद विमानतळावर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहेत. या बैठकीला गुजरातचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देखील उपस्थित आहेत.