उत्तरप्रदेश : उत्तर प्रदेशातील आग्रा येथे अचंबित करणारी घटना घडली आहे. नवऱ्याने उंच टाचेची चप्पल घेऊन दिली नाही. त्यामुळे महिलेने थेट नवऱ्यापासून घटस्फोट मागितला आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये या महिलेचे लग्न झाले होते.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
पतीने उंच टाचेची सँडल घेऊन दिली नाही म्हणून पत्नीने घटस्फोट मागितल्याची घटना घडली आहे. या महिलेला उंच टाचेची चप्पल घालण्याची सवय होती. महिलेने उंच टाचेची सँडल देण्याची मागणी नवऱ्याकडे केली. काही दिवसांनी नवऱ्याने या महिलेला उंच टाचेची सँडल आणून दिली. हीच उंच टाचेची सँडल घालून महिला पडली आणि तिला दुखापत झाली. त्यामुळे नवऱ्याने उंच टाचेची सँडल वापरण्यास मनाई केली. यामुळे दोघांमध्ये वाद झाले.
हेही वाचा : खासदार उदयनराजे राहुल सोलापूरकरावर संतापले; काय म्हणाले?
उंच टाचेची सँडल घालण्यास मनाई केल्याने या नवरा आणि बायकोमध्ये वादाची ठिणगी पडली. त्यानंतर कुठलाही विचार न करता बायकोने नवऱ्याविरोधात पोलिसात तक्रार केली. तसेच नवऱ्यापासून घटस्फोट मिळावा अशी मागणी केली. त्यानंतर ही महिला तिच्या माहेरी निघून गेली.
हेही वाचा : गनिमी काव्याने आंदोलन करणार; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा