Tuesday, November 18, 2025 02:44:44 AM

Man Becomes Billionaire in Minutes: काय सांगता!! काही मिनिटांत तरुण बनला अब्जाधीश! खात्यात अचानक जमा झाले 2800 कोटी

नोटरी वकील आणि शाळेचे मालक विनोद डोंगले यांच्या खात्यात अचानक 28 अब्ज 17 कोटी 41 लाख 29 हजार रुपये जमा झाले, ज्यामुळे ते काही मिनिटांसाठी अब्जाधीश बनले.

man becomes billionaire in minutes काय सांगता काही मिनिटांत तरुण बनला अब्जाधीश खात्यात अचानक जमा झाले 2800 कोटी

Man Becomes Billionaire in Minutes: मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील धामनोड येथे एका व्यक्तीच्या डिमॅट खात्यामध्ये अचानक इतके पैसे जमा झाले की, त्याला काही क्षणासाठी हा चमत्कारचं वाटला. नोटरी वकील आणि शाळेचे मालक विनोद डोंगले यांच्या खात्यात अचानक 28 अब्ज 17 कोटी 41 लाख 29 हजार रुपये जमा झाले, ज्यामुळे ते काही मिनिटांसाठी अब्जाधीश बनले.

नेमकं काय घडलं? 

वृत्तानुसार, हर्सिल अ‍ॅग्रो लिमिटेडच्या 1312 शेअर्स त्यांच्या खात्यात जमा झाले. प्रति शेअर किंमत 2 कोटी 14 लाख 74 हजार नोंदवण्यात आली होती. हे सर्व पाहून डोंगले यांना मोठा धक्का बसला. 

हेही वाचा - Luxury Train In India: 20 लाखांचं तिकीट अन् पाचतारांकित सुविधा! भारतातील 'या' लक्झरी ट्रेनची जगभरात चर्चा

सत्य समोर आल्यानंतर निराशा

डोंगले यांना काही वेळाने सत्य समजले की ही फक्त तांत्रिक चूक होती. शेअर्सची किंमत लवकरच मूळ किमतीवर परतली आणि खाते सामान्य स्थितीत आले. डोंगले म्हणाले, 'माझ्या खात्यात इतकी मोठी रक्कम पाहून क्षणभर वाटले की देवी लक्ष्मीने मला आशीर्वाद दिला आहे. मुलांसाठी संस्था स्थापन करण्याचा विचारही केला. पण नंतर समजले की हे फक्त तांत्रिक त्रुटीमुळे झाले.' 


सम्बन्धित सामग्री