Sunday, June 15, 2025 10:23:28 AM

Aamir Hamza: लष्कर-ए-तोयबाचा सहसंस्थापक आमिर हमजावर गोळीबार

लष्कर-ए-तोयबाचा सहसंस्थापक आमिर हमजा याच्यावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आमिर हमजा सध्या शेवटच्या घटका मोजत आहे.

aamir hamza लष्कर-ए-तोयबाचा सहसंस्थापक आमिर हमजावर गोळीबार

नवी दिल्ली : लष्कर-ए-तोयबाचा सहसंस्थापक आमिर हमजा याच्यावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आमिर हमजा सध्या शेवटच्या घटका मोजत आहे. गेल्या तीन महिन्यात तीन मोठ्या दहशतवाद्यांचा अज्ञाताकडून खात्मा करण्यात आला आहे. 

हाफिजचा जवळचा साथीदार आमिर हमजा रुग्णालयात शेवटच्या घटका मोजतोय. आमिर हमजावर गोळीबार करण्यात आला आहे. सध्या हमजा लाहौरच्या रुग्णालयात उपचार घेत आहे. गेल्या तीन महिन्यात तीन मोठ्या दहशतवाद्यांचा अज्ञातांकडून खात्मा करण्यात आला आहे. याच्या फक्त तीन दिवस आधी, लष्कर-ए-तैयबाचा एक हाय प्रोफाइल ऑपरेटिव्ह आणि दहशतवाद्यांची भरती करण्यासाठी जबाबदार असलेला अबू सैफुल्लाह याला पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी गोळ्या घालून ठार मारले. आमिर हमजानंतर पुढचा दहशतवादी हाफिज सईदचा? असेल असा सवाल उपस्थित होत आहे.

हेही वाचा : Unseasonal Rain: महाराष्ट्रात अवकाळीचा धुमाकूळ; अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली

कोण आहे आमिर हमजा?
आमिर हमजा हा लष्कर-ए-तोयबाचा सह-संस्थापक आणि कमांडर आहे. कुख्यात दहशतवादी हाफिज सईदचा राईट हँड म्हणून त्याची ओळख आहे. ऑगस्ट 2012 मध्ये अमेरिकेकडून हमजा याला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आलं आहे. 2000 च्या दशकात भारतविरोधी कारवाईत हमजा सक्रीय होता. 2005 मध्ये बंगळुरुमधील हल्ल्यात त्याचा हात होता.  

ऑगस्ट 2012 मध्ये अमेरिकेने हमजा याला जागतिक दहशतवादी घोषित केलं होतं. तो मूळचा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गुजरांवालाचा रहिवासी आहे. तो कुख्यात दहशतवादी हाफिज सईद व अब्दुल्ल रहमान मक्की यांचा निकटवर्तीय आहे. 2000 च्या दशकात हमजा भारतविरोधातील दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय होता. 2005 साली बंगळुरूमधील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्सवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटात हमजा सहभागी होता.


सम्बन्धित सामग्री