Gujarat High Court hearing Viral Video
Edited Image
Gujarat High Court hearing Viral Video: गुजरात उच्च न्यायालयात एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान, चक्क एक व्यक्ती टॉयलेट सीटवर बसून न्यायाधीशांसमोर हजर राहिला. या सुनावणीचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे प्रकरण 20 जूनचे असल्याचे सांगितले जात आहे. प्राप्त माहितीनुसार, गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश निर्जर एस देसाई एका प्रकरणात व्हर्च्युअल सुनावणी करत होते. सुनावणीदरम्यान, सरमद बॅटरी नावाची व्यक्ती त्यात सामील होते. यावेळी तरुणाने कानात ब्लूटूथ इअरफोन घातलेला दिसत असून मोबाईल काही अंतरावर ठेवला आहे. त्याच्या मागे फ्लश बॉक्स दिसत आहे. ज्यावरून तो तरुण टॉयलेट सीटवर बसलेला दिसत आहे.
हेही वाचा - अजब प्रकार; मद्यपी महिलेने चालवली रेल्वे रुळावर गाडी
टॉयलेट सीटवर बसलेल्या तरुणाने एका प्रकरणात एफआयआर रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. एफआयआर रद्द करण्यासाठी हा तरुण 20 जून रोजी सुनावणीला उपस्थित राहिला. तो प्रतिवादी म्हणजेच आरोपी म्हणून हजर झाला. या दरम्यान, दोन्ही पक्षांमध्ये समझोता झाल्यानंतर एफआयआर रद्द करण्यात आला.
हेही वाचा - जीव वाचवण्यासाठी पठ्ठ्या भिडला थेट बिबट्याशी; घटनेचा व्हिडीओ समोर
गुजरात उच्च न्यायालयात हा पहिलाच प्रकार नाही. यापूर्वी, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दरम्यान, एका तरुणाने टॉयलेट सीटवर बसून सुनावणीला हजेरी लावली होती. त्यानंतर, न्यायाधीशांनी कारवाई करत त्या तरुणाला 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. यासोबतच, आरोपीला उच्च न्यायालयाच्या बागेची 2 आठवड्यांसाठी स्वच्छता करण्याचे आदेशही देण्यात आले होते.