एआयचा प्रभाव सध्या आपल्याला आपल्या आजूबाजूलाच पाहायला मिळतो आहे. अगदी लहानसहान माहितीसाठी आपण एआयची मदत घेतो. असं असताना जर शाळेतील शिक्षिकाच जर एआय निर्मित रोबोट असेल तर, असा एक प्रयोग उत्तर प्रदेशातील 17 वर्षीय विद्यार्थ्याने केला आहे. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील 17 वर्षीय आदित्य कुमार या विद्यार्थ्याने डिजिटल साधनांचा वापर करून शिक्षणात नवी क्रांती घडवून आणली आहे. आदित्य कुमार हा शिवचरण इंटर कॉलेजमध्ये बारावीचा विद्यार्थी असून, त्याने सोफी नावाची एआय-चालित शिक्षिका विकसित केली आहे, ज्याने वर्गात रोबोट "शिकवताना" दाखवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वांचे लक्ष वेधले.
हा एआय रोबोट त्याने 25,000 रुपये खर्चून तयार केला आहे. सोफील तयार करण्यासाठी आदित्यला सुमारे चार ते पाच वर्षे लागली. सोफी नावाचा हा रोबोट मोठ्या भाषेच्या मॉडेल (एलएलएम) चिपसेटने सुसज्ज असून तिने मानवी मेंदूइतकाच जलद डेटा प्रक्रिया करतो. सध्या, सोफी हिंदीमध्ये संवाद साधते, जरी लेखन क्षमता वाढवण्याच्या योजना सुरू आहेत. कोणताही प्रश्न विचाला असता सोफी त्याच्यावर योग्य ते उत्तर देत असताना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ती आता शाळेच्या कर्मचाऱ्यांचा भाग बनली आहे आणि मानवी प्रशिक्षकांच्या अनुपस्थितीत पर्यायी शिक्षक म्हणून काम करते आहे.
यावेळी सोफीला काही प्रश्न विचारण्यात आले असता सोफी म्हणाली की, "मी एक एआय शिक्षिका रोबोट आहे. माझे नाव सोफी आहे आणि मला आदित्यने तयार केलं आहे. मी बुलंदशहर येथील शिवचरण इंटर कॉलेजमध्ये शिकवते. मुलांनो, तुम्हाला माझ्याकडून काही जाणून घ्यायचे आहे का?" असं म्हणताच आदित्यने तिला विचारले की, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? यावर सोफी म्हणाली की, भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद आहेत… सोफीचं हे अचूक उत्तर ऐकताच तिथे उपस्थित सर्वच जण चकीत झाले. त्यानंतर त्याने तिला देशाच्या पहिल्या पंतप्रधानांचे नाव विचारले.. यावर सोफीने पंडित जवाहरलाल नेहरू यांच नाव घेत अचूक उत्तर दिल. त्यानंतर जगातील सर्वात उंच इमारत, भारताचे पहिले राष्ट्रपती, पहिले पंतप्रधान आणि अगदी "100 + 92" सारख्या मूलभूत अंकगणिताबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे सोफीने योग्य उत्तर दिल.
पुढे आदित्यने त्याने विकसित केलेल्या रोबोटबद्दल बोलताना सांगितले की, " हा रोबोट तयार करण्यासाठी एलएलएम चिपसेट वापरला आहे, जो रोबोट बनवणाऱ्या मोठ्या कंपन्या देखील वापरतात. तो विद्यार्थ्यांच्या शंका दूर करू शकतो. सध्या ती फक्त बोलू शकते, परंतु आम्ही ते डिझाइन करत आहोत जेणेकरून ते लवकरच लिहू शकेल. प्रत्येक जिल्ह्यात एक प्रयोगशाळा असावी जेणेकरून विद्यार्थी तिथे येऊन संशोधन करू शकतील." तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण अधिक सुलभ आणि रोचक करण्यासाठी आदित्यने विकसित केलेला हा एआय रोबोट टीचर सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. 12 वीत शिकणाऱ्या 17 वर्षांच्या आदित्ये अशी कमाल केली आहे की देशभरात त्यांची चर्चा सुरू झाली आहे.