Afghan Boy First Picture : प्लेनच्या ‘लँडिंग गिअर’मध्ये लपून काबूलहून दिल्लीत पोहोचला 13 वर्षांचा अफगाणी मुलगा

प्लेनच्या 'लँडिंग गिअर'मध्ये लपून काबुलहून दिल्लीत पोहोचला 13 वर्षांचा अफगाणी मुलगा!<br/>सुरक्षा अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ; 'ऑपरेशन'नंतर मुलाला परत काबुलला पाठवले

Afghan Boy First Picture : प्लेनच्या ‘लँडिंग गिअर’मध्ये लपून काबूलहून दिल्लीत पोहोचला 13 वर्षांचा अफगाणी मुलगा

नवी दिल्ली: एक विलक्षण अविश्वसनीय प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. या घटनेत, 13 वर्षांचा एक अफगाणी मुलगा काबुलहून दिल्लीत थेट विमानाने पोहोचला.. पण प्रवासी म्हणून नाही, तर तो विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये (Landing Gear) लपून आला होता. या मुलाचा पहिला फोटो आता समोर आला आहे. या फोटोमध्ये तो भेदरलेला आणि गोंधळलेला दिसत आहे. काबुल विमानतळावरच्या अनेक सुरक्षा तपासण्यांना चकवा देत तो कोणतीही कागदपत्रे नसताना विमानापर्यंत पोहोचला आणि लँडिंग गिअरमध्ये लपला होता.

लँडिंग गिअर म्हणजे काय?
लँडिंग गिअर हा विमानाचा असा भाग असतो, जो उड्डाण, लँडिंग आणि जमिनीवर चालताना विमानाला आधार देतो. यात मुख्यतः चाके, स्टर्ट्स आणि हायड्रॉलिक सिस्टीमचा समावेश असतो. काही विमानांमध्ये हा गिअर उड्डाणादरम्यान बंद होतो, ज्यामुळे विमानाची 'एरोडायनॅमिक्स' सुधारते. प्रचंड वजन, अति वेग आणि वेगवेगळ्या हवामानाचा सामना करण्यासाठी याची रचना केलेली असते.

हेही वाचा – US Tarrif on INDIA : जयशंकर यांच्या भेटीनंतर रुबिओंचा दावा! ट्रम्प प्रशासन भारतावरचे टॅरिफ्स कमी करू शकते; रशियावरील निर्बंधांबाबत युरोपला सुनावणी

दिल्ली विमानतळावर समोर आली धक्कादायक बाब
जेव्हा काबुलहून काम एअरलाइन्सचे RQ 4401 हे विमान दिल्ली विमानतळावर उतरले, तेव्हा रनवेवर एका मुलाला पाहून सुरक्षा अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. चौकशी केल्यावर मुलाने सांगितलेली कहाणी कोणालाच खरी वाटेना. त्याने सांगितले की, तो याच विमानातून आला आहे, पण प्रवासी म्हणून नाही, तर लँडिंग गिअरमध्ये बसून! प्रवाशांच्या यादीत त्याचे नाव नव्हते. सुरक्षा अधिकाऱ्यांनी तातडीने CISF ला याची माहिती दिली.

सुरक्षा यंत्रणांचा निर्णय
सुरक्षा अधिकाऱ्यांनी लगेच CISF (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल) ला याची माहिती दिली. CISF आणि नंतर IBने (इंटेलिजन्स ब्यूरो) या मुलाची चौकशी केली. या चौकशीतून असे स्पष्ट झाले की, हा मुलगा चुकून दिल्लीला येणाऱ्या विमानात बसला. खरे तर, त्याला इराणला जायचे होते. मुलाचे कमी वय, अफगाण अधिकारी आणि कुंदुझमधील त्याच्या कुटुंबीयांशी झालेल्या बोलण्यानंतर भारतीय एजन्सीने त्याच्यावर कोणताही गुन्हा न दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, त्याला त्याच काम एअरलाइन्सच्या विमानाने सुरक्षितपणे परत काबुलला पाठवण्यात आले.

हेही वाचा – China's New Gold Strategy: चीनचा सोन्याचा नवा डाव, परदेशी राखीव साठा सांभाळण्याची तयारी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number