Saturday, June 14, 2025 04:13:31 AM

पाकिस्तानशी मैत्री भोवली! सफरचंदानंतर आता तुर्कीतून येणाऱ्या 'मार्बल'वर बंदी

आता तुर्कीची पाकिस्तानला पाठीशी घालण्याची वृत्ती पाहून भारतीय व्यावसायिकांनी तुर्कीसोबत काम न करण्याची घोषणा केली आहे.

पाकिस्तानशी मैत्री भोवली सफरचंदानंतर आता तुर्कीतून येणाऱ्या मार्बलवर बंदी
Ban on Turkish imports प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image

Boycott Turkey: पहलगाममध्ये पाकिस्तानने दहशतवादी हल्ला केला, त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला. दरम्यान, तुर्की पाकिस्तानसोबत उभे असल्याचे दिसून आले. भारत तुर्कीसोबत मोठा व्यवसाय करतो. आता तुर्कीची पाकिस्तानला पाठीशी घालण्याची वृत्ती पाहून भारतीय व्यावसायिकांनी तुर्कीसोबत काम न करण्याची घोषणा केली आहे. यावर, उदयपूर मार्बल प्रोसेसर्स कमिटीचे अध्यक्ष कपिल सुराणा यांचे एक विधान समोर आले आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की 'भारत सरकार एकटे नाही, आपण सर्व व्यापारी आपल्या देशासोबत उभे आहोत.'

हेही वाचा - न्यायमूर्ती भूषण गवई बनले भारताचे 52 वे सरन्यायाधीश! राष्ट्रपती मुर्मू यांनी दिली शपथ

भारतात तुर्कीतून येणाऱ्या संगमरवरावर बंदी - 

भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावादरम्यान, उदयपूरच्या संगमरवरी व्यापाऱ्यांनी पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीयेसोबत काम करणे थांबवले आहे. यावर उदयपूर मार्बल प्रोसेसर्स कमिटीचे अध्यक्ष कपिल सुराणा यांनी सांगितले की, उदयपूर हे आशियातील सर्वात मोठे मार्बल निर्यातदार आहे. समितीच्या सर्व सदस्यांनी संयुक्तपणे निर्णय घेतला आहे की ते तुर्कीसोबतचा व्यापार थांबवत आहेत. भारतात आयात होणाऱ्या 70 टक्के संगमरवर तुर्कीमधून येतो.

हेही वाचा - पाकिस्तानला आणखी एक धक्का! नवी दिल्लीतील उच्चायुक्तालयाच्या कर्मचाऱ्याला 24 तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश

भारत सरकार एकटे नाही - 

कपिल सुराणा यांनी पुढे बोलताना सांगितलं की, केवळ उदयपूरच नाही, तर सर्व संगमरवरी संघटनांनी तुर्कीयेसोबतचे त्यांचे व्यवसाय थांबवले तर जगाला एक मोठा संदेश जाईल. सर्वांना कळेल की भारत सरकार एकटे नाही, व्यापारी आणि सर्व भारतीय आपल्या सरकारसोबत उभे आहेत. जर आपण तुर्कीसोबत व्यापार थांबवला तर भारतीय संगमरवराची मागणी वाढेल. संगमरवरी व्यतिरिक्त, तुर्कीहून येणाऱ्या इतर वस्तूंवर बंदी घातली पाहिजे. यामुळे इतर देशांना संदेश जाईल की भारत कोणताही निर्णय घेण्यास सक्षम आहे.

यापूर्वी पुण्याती व्यापाऱ्यांनी तुर्कीतून येणाऱ्या सफरचंदावर बंदी घातली होती. व्यापाऱ्यांनी तुर्कीऐवजी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, इराण येथून सफरचंद खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
 


सम्बन्धित सामग्री