Agni Prime Missile : रेल्वेवरूनही क्षेपणास्त्र प्रक्षेपण शक्य; अग्नि-प्राइमची यशस्वी चाचणी

भारताने प्रथमच रेल्वे-आधारित मोबाइल लॉंचर प्रणालीतून अग्नि-प्राइम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. 2,000 किमी मारक क्षमतेसह हे तंत्रज्ञान भारताच्या सामरिक शक्तीत नवा टप्पा मानला जात आहे.

Agni Prime Missile : रेल्वेवरूनही क्षेपणास्त्र प्रक्षेपण शक्य; अग्नि-प्राइमची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली: भारताच्या संरक्षण क्षेत्रात नवे पर्व सुरू झाले आहे. देशाने प्रथमच रेल्वेवरून क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्याची क्षमता सिद्ध केली आहे. अग्नि-प्राइम या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचे रेल्वे-आधारित मोबाइल लॉंचर प्रणालीतून यशस्वी परीक्षण करण्यात आले. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता तब्बल 2000 किलोमीटरपर्यंत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या चाचणीसंदर्भात सोशल मीडियावर माहिती देत डीआरडीओ आणि सशस्त्र दलांचे कौतुक केले. त्यांनी नमूद केले की, ही नवी पिढीची क्षेपणास्त्र प्रणाली अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी सज्ज आहे. तसेच कमी वेळेत आणि कमी दृश्यतेत अचूक प्रहार करण्याची क्षमता यात आहे.

या चाचणीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, विशेषतः डिझाईन केलेल्या रेल्वे-आधारित लॉंचरमधून ही चाचणी पार पडली. कोणत्याही पूर्वअटींशिवाय रेल्वे नेटवर्कवर ही प्रणाली चालवता येते. त्यामुळे देशभरात कुठूनही गतिशीलपणे प्रक्षेपण करता येईल.

हेही वाचा: LEH VIOLENCE: लेहमध्ये हिंसक आंदोलन; राज्यत्वाच्या मागणीवरून तणाव, किमान 3 मृत

या यशामुळे भारत त्या मोजक्या देशांमध्ये सामील झाला आहे, ज्यांच्याकडे रेल्वेवरून कॅनिस्टराइज्ड लॉंच प्रणाली विकसित करण्याचे कौशल्य आहे. ही क्षमता भारताच्या सामरिक शक्तीत मोठी भर घालणारी ठरली आहे.

संरक्षण मंत्री सिंह यांनी या कामगिरीसाठी डीआरडीओ, स्ट्रॅटेजिक फोर्स कमांड आणि सशस्त्र दलांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांचे म्हणणे आहे की, ही चाचणी केवळ तांत्रिक कामगिरी नसून भारताच्या संरक्षणात्मक स्वावलंबनाच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number