Air India Plane Accident: बंगळुरू विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाचा अपघात; लँडिंग करताना शेपूट धावपट्टीवर आदळलं, 179 प्रवासी…

दिल्लीहून बंगळुरूला आलेल्या एअर इंडियाच्या एका विमानाचे लँडिंग होत असताना, विमानाचा मागील भाग (शेपूट) थेट धावपट्टीवर (Runway) आदळला. या घटनेमुळे विमानतळ परिसरात काही काळ एकच खळबळ उडाली होती.

Air India Plane Accident: बंगळुरू विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाचा अपघात; लँडिंग करताना शेपूट धावपट्टीवर आदळलं, 179 प्रवासी…

Air India Plane Accident: बंगळुरूच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाबाबत एक थरारक घटना समोर आली आहे. दिल्लीहून बंगळुरूला आलेल्या एअर इंडियाच्या एका विमानाचे लँडिंग होत असताना, विमानाचा मागील भाग (शेपूट) थेट धावपट्टीवर (Runway) आदळला. या घटनेमुळे विमानतळ परिसरात काही काळ एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने, वैमानिक आणि केबिन क्रू सदस्यांसह सर्व 179 प्रवासी पूर्णपणे सुरक्षित असून कोणालाही दुखापत झालेली नाही. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून हे विमान तात्काळ ग्राउंड करण्यात आले असून, त्याची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

प्रवाशांच्या सुविधेसाठी ‘ग्राउंड टीम’ सक्रिय; परतीचे उड्डाण रद्द
या दुर्घटनेमुळे बंगळुरूवरून दिल्लीला जाणारे परतीचे विमान (फ्लाइट AI2652) रद्द करण्यात आले आहे. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘फ्लाइट AI2651’ या विमानाला लँडिंग दरम्यान तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागल्याने ते तज्ज्ञांच्या देखरेखीखाली तपासणीसाठी ठेवण्यात आले आहे. दरम्यान, विमान रद्द झाल्यामुळे बंगळुरू विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांना दिल्लीला पोहोचवण्यासाठी एअर इंडियाकडून तांत्रिक पातळीवर पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल कंपनीने खेद व्यक्त केला असून, प्रवाशांची सुरक्षा हीच आपली सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे स्पष्ट केले आहे.

‘वेक टर्ब्युलन्स’ ठरले कारणीभूत; वैमानिकाने घेतला ‘गो-अराऊंड’चा निर्णय
विमानतळ अधिकार्‍यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना ‘वेक टर्ब्युलन्स’ म्हणजेच हवेच्या प्रवाहातील तीव्र अस्थिरतेमुळे घडली. एअर इंडियाचे A321 विमान लँड होण्याच्या काही क्षण आधीच, त्याच धावपट्टीवरून एका मोठ्या B747 मालवाहू (कार्गो) विमानाने उड्डाण केले होते. या कार्गो विमानोन्मुख हवेच्या प्रवाहामुळे एअर इंडियाच्या विमानाचे संतुलन बिघडू लागले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैमानिकाने ऐनवेळी लँडिंगचा प्रयत्न थांबवून विमान पुन्हा हवेत घेण्याचा (गो-अराऊंड) निर्णय घेतला. याच प्रक्रियेदरम्यान विमानाचा मागील भाग धावपट्टीच्या पृष्ठभागाला घासून आदळला.

हेही वाचा – Hamza Burhan Death: पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड हमजा बुरहानचा पाकिस्तानमध्ये खात्मा; अज्ञात हल्लेखोरांनी घातल्या गोळ्या

काय असते ‘वेक टर्ब्युलन्स’ (Wake Turbulence)?
विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, जेव्हा एखादे महाकाय विमान उड्डाण करते, तेव्हा त्याच्या पंखांच्या टोकांमधून हवेचे दोन अत्यंत शक्तिशाली आणि चक्राकार भोवरे (Vortices) निर्माण होतात. हे हवेचे भोवरे विमानामागच्या हवेत बराच काळ अतिशय वेगाने फिरत राहतात, ज्याला ‘वेक टर्ब्युलन्स’ म्हणतात. जर या भोवऱ्यांच्या परिघात दुसरे एखादे विमान आले, तर त्याला तीव्र हेलकावे बसतात आणि विमानाचे नियंत्रण सुटण्याचा मोठा धोका असतो. विशेषतः टेकऑफ आणि लँडिंगच्या वेळी शांत हवामानात हा धोका अधिक वाढतो, ज्यामुळे दोन विमानांच्या उड्डाणामध्ये सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक असते.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number