Air India Flight Technical Snag: मुंबईहून नेवार्ककडे निघालेल्या एअर इंडियाचे विमानात (AI191) 22 ऑक्टोबर रोजी हवेत असतानाच तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून पुन्हा मुंबई विमानतळावर परतले. वैमानिकांनी दक्षता घेत विमान सुरक्षितरीत्या उतरवले. सध्या विमानाची सखोल तपासणी सुरू असून उड्डाणासाठी ते पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतरच पुन्हा ते सेवा सुरू करणार आहे.
या घटनेनंतर मुंबई-नेवार्क AI191 आणि त्याचा परतीचा टप्पा नेवार्क-मुंबई AI144 हे दोन्ही उड्डाणे रद्द करण्यात आली. एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील बाधित प्रवाशांना हॉटेलमध्ये निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच त्यांचे पुनर्बुकिंग एअर इंडिया किंवा भागीदार एअरलाईन्सच्या पर्यायी उड्डाणांवर करण्यात आले आहे.
हेही वाचा - Rishabh Tondon: गायक आणि अभिनेता ऋषभ टंडन (फकीर) याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; संगीतविश्वात शोककळा
नेवार्कहून AI144 ने प्रवास करणार असलेल्या प्रवाशांनाही उड्डाण रद्द झाल्याची माहिती देण्यात आली असून, त्यांच्यासाठीही लवकरात लवकर पर्यायी प्रवासाची व्यवस्था केली जात आहे. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'आमच्या प्रवाशांचे आणि विमान कर्मचार्यांचे सुरक्षितता आणि कल्याण हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. विमानाचे मुंबईला परतणे ही केवळ खबरदारीचा भाग होती आणि ती एक मानक प्रक्रिया आहे.'
हेही वाचा - Gold Rate Drop: यूएस-चीन तणावाचा परिणाम सोन्याच्या दरावर; सोन्याच्या दरात घट; गुंतवणूकदारांचा कल बदलला
आठवड्याच्या सुरुवातीला आणखी एक घटना
या आठवड्याच्या सुरुवातीला एअर इंडिया एक्सप्रेसच्या दिब्रुगड-गुवाहाटी मार्गावरील बोईंग 737 मॅक्स 8 विमानालाही तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागला होता. गुवाहाटीहून दुपारी 12.20 वाजता उड्डाण करून दिब्रुगडला 1.25 वाजता पोहोचायचे होते. मात्र लँडिंगच्या थोडे आधी वैमानिकांना एका पंखाशी संबंधित एव्हियोनिक्स प्रणालीमध्ये समस्या आढळली. तत्काळ निर्णय घेत वैमानिकांनी विमान गुवाहाटीला परत नेले. अभियंत्यांच्या कसून तपासणी आणि दुरुस्ती नंतर फ्लाइट IX-1186 ने पुन्हा उड्डाण केले.