America will help Iran: इराणच्या अणुप्रकल्पांवर प्राणघातक बॉम्ब टाकून ते उद्ध्वस्त केल्याचा दावा नुकताच करण्यात आला होता. मात्र, या घडामोडीनंतर अमेरिका इराणला मोठी आर्थिक मदत देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त अमेरिकन मीडिया ग्रुप 'सीएनएन'ने दिले आहे.
या वृत्तानुसार, अमेरिकेने इराणला 30 अब्ज डॉलर (अंदाजे अडीच लाख कोटी रुपये) गुंतवणूक स्वरूपात देण्याचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव इराण शांतता चर्चेला सहमत झाल्यास लागू होणार आहे. या चर्चेच्या अटींमध्ये काही निर्बंधांमधून सवलत देणे आणि परदेशी बँकांमध्ये गोठवलेली 6 अब्ज डॉलरची रक्कम वापरण्याची परवानगी देणे यांचाही समावेश आहे.
हेही वाचा : Bank Holidays in July 2025: जुलै 2025 मध्ये 13 दिवस बँकांना सुट्टी; राज्यनिहाय यादी जाहीर
सध्या इराणचे काही आर्थिक खाते परदेशी बँकांमध्ये गोठवण्यात आले आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावपूर्ण संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. व्हाईट हाऊसमध्ये 20 जून रोजी अमेरिकेचे राजदूत स्टीव्ह विटकॉफ आणि आखाती देशांच्या नेत्यांमध्ये बैठक झाली होती. या बैठकीत इराणला मदत करण्याच्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या चर्चेनुसार, अमेरिका थेट इराणला निधी देणार नसून, इतर आखाती देश या गुंतवणुकीत सहभागी होतील. त्यामुळे हा प्रस्ताव अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरू शकतो.