Global Trade Impact: युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारचा मोठा निर्णय; जूनपर्यंत ‘या’ उत्पादनांवर सीमाशुल्क पूर्णपणे माफ

सरकारने 30 जून 2026 पर्यंत प्रमुख पेट्रोकेमिकल उत्पादनांवर सीमाशुल्कात (Customs Duty) 100 टक्के माफी देण्याची घोषणा केली आहे.

Global Trade Impact: युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारचा मोठा निर्णय; जूनपर्यंत ‘या’ उत्पादनांवर सीमाशुल्क पूर्णपणे माफ

Global Trade Impact: मध्यपूर्वेतील संघर्षाला आज 34 दिवस पूर्ण झाले असून, या युद्धाचे पडसाद आता जागतिक व्यापारावर उमटू लागले आहेत. या गंभीर जागतिक परिस्थितीचा विचार करता, भारत सरकारने देशांतर्गत उद्योगांना बळ देण्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सरकारने 30 जून 2026 पर्यंत प्रमुख पेट्रोकेमिकल उत्पादनांवर सीमाशुल्कात (Customs Duty) 100 टक्के माफी देण्याची घोषणा केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विशेषतः खत आणि औषधनिर्माण क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे.

खत आणि रसायने उद्योगांना उभारी
मध्यपूर्वेतील युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत होण्याचे संकट निर्माण झाले आहे. अशा काळात खत कंपन्यांना आधार देण्यासाठी सरकारने अमोनियम नायट्रेटवरील आयात शुल्क पूर्णपणे माफ केले आहे. ही सवलत 2 एप्रिल ते 30 जून 2026 या कालावधीत लागू राहील. या निर्णयाचा मुख्य उद्देश खत आणि रसायन उद्योगांचा उत्पादन खर्च कमी करणे हा आहे. याचा थेट फायदा प्लास्टिक, पॅकेजिंग, वस्त्रोद्योग, औषधनिर्माण आणि वाहन घटक यांसारख्या कच्च्या मालावर अवलंबून असलेल्या क्षेत्रांना होणार असून, पर्यायाने ग्राहकांनाही स्वस्त दरात उत्पादने उपलब्ध होतील.

40 प्रमुख उत्पादनांचा समावेश
अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एकूण 40 प्रकारच्या पेट्रोकेमिकल कच्च्या मालावरील आयात शुल्क रद्द करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने खालील रसायनांचा समावेश आहे:
अमोनियम नायट्रेट
मिथेनॉल आणि फिनॉल
पीव्हीसी (PVC)
पॉलीप्रोपिलिन

हेही वाचा – Share Market Today: काल तेजी, आज मोठी पडझड; शेअर बाजारात सेन्सेक्स 1400 अंकांनी कोसळला, निफ्टीचीही मोठी घसरण

उच्चस्तरीय बैठकांचे सत्र
एकीकडे सीमाशुल्कात कपात केली असतानाच, दुसरीकडे खतांच्या उपलब्धतेबाबत सरकार सतर्क झाले आहे. केंद्रीय रसायन आणि खत मंत्री जे.पी. नड्डा यांनी विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांशी संवाद साधून युरिया व डीएपी (DAP) च्या साठ्याबाबत चर्चा केली. तसेच, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही या संदर्भात जे.पी. नड्डा यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा भासणार नाही, याची खातरजमा केली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number