जम्मू-काश्मीरमधील रामबनमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले; 3 जवानांचा मृत्यू

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील रामबन जिल्ह्यातील बॅटरी चष्माजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर वाहन 700 फूट खोल दरीत कोसळले.

जम्मू-काश्मीरमधील रामबनमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले; 3 जवानांचा मृत्यू
Edited Image, X

रामबन: जम्मू आणि काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात लष्कराच्या वाहनाचा अपघात झाला आहे. या अपघातात तीन सैनिकांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बॅटरी चष्माजवळ लष्कराचे एक वाहन नियंत्रणाबाहेर गेले आणि खोल दरीत कोसळले. बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. या अपघातात इतर काहीजण जखमी झाले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील रामबन जिल्ह्यातील बॅटरी चष्माजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर वाहन 700 फूट खोल दरीत कोसळले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, लष्कर, पोलिस, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) आणि स्थानिक स्वयंसेवकांनी तातडीने संयुक्त बचाव मोहीम सुरू केली. अपघातात बळी पडलेल्या तीन सैनिकांची ओळख पटली आहे. कॉन्स्टेबल अमित कुमार, सुजीत कुमार आणि मान बहादूर अशी त्यांची नावे आहेत.

हेही वाचा – पद्मश्री बाबा शिवानंद महाराज यांचे निधन; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

गेल्या पंधरवड्यापासून, रामसू-रामबन विभागात मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे रस्ता वाहून गेला आहे. महामार्गाची दुरुस्ती करून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे, परंतु 40 किमी पेक्षा जास्त लांबीचा रामबन-रामशू विभाग अजूनही जवळजवळ 300 किमी लांबीच्या महत्त्वाच्या महामार्गातील कमकुवत दुवा आहे. 

हेही वाचा – पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अजूनही दक्षिण काश्मीरमध्येच; त्यांना कोणीतरी अन्न, इतर साहित्य पुरवतेय : सूत्र

पूंछमध्ये लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळले – 

यापूर्वी डिसेंबर 2024 मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ येथेही एक मोठा अपघात झाला होता. पूंछ जिल्ह्यातील मेंढर उपविभागातील बालनोई भागात भारतीय लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळले. या घटनेत 5 सैनिक ठार झाले होते. तसेच 5 जण गंभीर जखमी झाले होते. लष्कराच्या वाहनातून एकूण 10 जवान प्रवास करत होते.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number