Apple Security Warning: iPhone आणि iPad वापरकर्त्यांनो सावधान! तुमची वैयक्तिक माहिती धोक्यात? सरकारचा मोठा इशारा

भारत सरकारच्या 'इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम' (CERT-In) ने ॲपल उपकरणांबाबत एक 'अतिगंभीर' (Critical) इशारा जारी केला आहे.

Apple Security Warning: iPhone आणि iPad वापरकर्त्यांनो सावधान! तुमची वैयक्तिक माहिती धोक्यात? सरकारचा मोठा इशारा

Apple Security Warning: जर तुम्ही Apple चा iPhone, iPad किंवा Mac वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारत सरकारच्या 'इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम' (CERT-In) ने ॲपल उपकरणांबाबत एक 'अतिगंभीर' (Critical) इशारा जारी केला आहे. या उपकरणांमधील सॉफ्टवेअर त्रुटींचा फायदा घेऊन हॅकर्स तुमच्या फोनचा ताबा घेऊ शकतात, असे या संस्थेने म्हटले आहे.

तुमचा डेटा आणि प्रायव्हसी धोक्यात
CERT-In च्या माहितीनुसार, ॲपलच्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये काही गंभीर सुरक्षा त्रुटी (Vulnerabilities) आढळून आल्या आहेत. या त्रुटींचा वापर करून सायबर हल्लेखोर तुमच्या उपकरणात अनधिकृत प्रवेश मिळवू शकतात. एकदा का हॅकर्सनी प्रवेश मिळवला की, ते तुमच्या फोनमधील डेटा चोरू शकतात, मेमरी दूषित करू शकतात किंवा तुमचे उपकरण पूर्णपणे निकामी करू शकतात. हा धोका वैयक्तिक वापरकर्त्यांसह कॉर्पोरेट क्षेत्रातील उपकरणांनाही तितकाच आहे.

कोणती उपकरणे आणि व्हर्जन्स आहेत धोक्यात?
सरकारी सूचनेनुसार, खालील सॉफ्टवेअर आवृत्त्या वापरणाऱ्या उपकरणांवर हल्ल्याचा मोठा धोका आहे:
iOS आणि iPadOS: 15.8.7, 16.7.5, 16.7.15 आणि 17.3 पेक्षा जुन्या आवृत्त्या.
macOS: 13.5, 14.2 आणि 14.3 पेक्षा जुन्या आवृत्त्या.
Safari Browser: वरील आवृत्त्यांमध्ये समाविष्ट असलेला सफारी ब्राउझर देखील या धोक्याच्या कक्षेत येतो.

हॅकर्स कसा करतात हल्ला?
हल्लेखोर दूरस्थपणे (Remotely) म्हणजेच जगात कोठूनही तुमच्या उपकरणाला लक्ष्य करू शकतात. सिस्टममधील लूपहोल्सचा फायदा घेऊन ते अनधिकृत कोड रन करू शकतात, ज्यामुळे वापरकर्त्याला समजायच्या आतच त्याच्या फोनचा ताबा दुसऱ्याच्या हातात जाऊ शकतो. यामुळे आर्थिक फसवणूक किंवा खाजगी माहिती लीक होण्याची शक्यता वाढली आहे.

हेही वाचा – SBI YONO अ‍ॅप ब्लॉक होणार? आधार अपडेटच्या नावाखाली मोठी फसवणूक; ग्राहकांना धोक्याचा इशारा

बचावासाठी त्वरित करा 'हे' काम
ॲपलने या सुरक्षा त्रुटींचे निराकरण करण्यासाठी नवीन अपडेट्स जारी केले आहेत. सुरक्षित राहण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
तुमच्या उपकरणाच्या 'Settings' मध्ये जा.
'General' पर्याय निवडा.
'Software Update' वर क्लिक करा.
जर काही अपडेट उपलब्ध असेल, तर ते तत्काळ इन्स्टॉल करा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number