Oxytocin Injection Ban: प्रसूतीदरम्यान वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिटोसिन इंजेक्शनवर बंदी; मोठ कारण आलं समोर

औषध नियंत्रण विभागाने संपूर्ण राज्यात प्रसूतीदरम्यान वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिटोसिन इंजेक्शनच्या एका विशिष्ट बॅचवर तात्काळ प्रभावाने बंदी घातली आहे.

Oxytocin Injection Ban: प्रसूतीदरम्यान वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिटोसिन इंजेक्शनवर बंदी; मोठ कारण आलं समोर

Oxytocin Injection Ban: राजस्थानच्या औषध नियंत्रण विभागाने संपूर्ण राज्यात प्रसूतीदरम्यान वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिटोसिन इंजेक्शनच्या एका विशिष्ट बॅचवर तात्काळ प्रभावाने बंदी घातली आहे. एका विभागीय चौकशीत असे निष्पन्न झाले की, या इंजेक्शनचा एक नमुना विहित गुणवत्ता मानकांची पूर्तता करण्यात अपयशी ठरला आहे. यामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेचा विचार करून औषध नियंत्रण विभागाने या इंजेक्शनच्या विक्रीवर आणि वापरावार तात्काळ बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

इंजेक्शनमध्ये औषधाचे प्रमाण कमी; उत्पादक कंपनी चौकशीच्या फेऱ्यात
राजस्थानचे औषध नियंत्रक अजय फाटक यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमधील अमृतसर येथे स्थित 'जॅक्सन लॅबोरेटरीज प्रा. लि.' (Jackson Laboratories Pvt. Ltd.) या कंपनीने उत्पादित केलेल्या 'TOCIN' (ऑक्सिटोसिन इंजेक्शन 5 मि.ली.) च्या एका नमुन्याची गुणवत्ता चाचणी अयशस्वी ठरली आहे. प्रयोगशाळेतील तपासणीदरम्यान या इंजेक्शनमधील ऑक्सिटोसिनचे प्रमाण विहित मात्रेपेक्षा खूपच कमी असल्याचे आढळले. औषधाचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याच्या परिणामकारकतेबाबत आता गंभीर चिंता निर्माण झाली आहे.

प्रसूतीदरम्यान महिलांच्या आरोग्याला गंभीर धोका
हे ऑक्सिटोसिन इंजेक्शन सामान्यतः गर्भवती महिलांना प्रसूतीवेदना सुरू करण्यासाठी (प्रसूती प्रेरित करण्यासाठी) आणि प्रसूतीनंतर होणारा अतिरक्तस्राव रोखण्यासाठी दिले जाते. वैद्यकीय तज्ञांच्या मते, इंजेक्शनमध्ये ऑक्सिटोसिनचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी असल्यास त्याचा आईच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. प्रसूतीसारख्या अत्यंत संवेदनशील आणि आपत्कालीन परिस्थितीत यामुळे महिलांचे धोके लक्षणीयरीत्या वाढू शकतात, ज्यामुळे यावर बंदी घालणे अत्यंत गरजेचे होते.

इतर बॅचेसचीही होणार कसून चाचणी आणि तपासणी
या गंभीर प्रकरणानंतर औषध नियंत्रण विभागाने अधिक कडक पावले उचलली असून, संबंधित इंजेक्शनच्या इतर बॅचेसची तसेच या कंपनीने उत्पादित केलेल्या इतर औषधांच्या नमुन्यांचीही चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. आता औषध नियंत्रण विभागाचे एक विशेष विभागीय पथक संपूर्ण राज्यात या औषधाचा पुरवठा आणि वापर यावर बारकाईने देखरेख ठेवणार आहे, जेणेकरून निकृष्ट दर्जाचे कोणतेही औषध रुग्णांपर्यंत पोहोचणार नाही.

कोटा वैद्यकीय महाविद्यालयात वापर झाल्याने खळबळ
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, याच कंपनीच्या 1 मि.ली. ऑक्सिटोसिन इंजेक्शनची एक वेगळी बॅच कोटा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने स्थानिक पातळीवरून खरेदी केली होती. ही औषधे रुग्णांना 'न्यू मेडिकल कॉलेज हॉस्पिटल'मध्ये प्रसूतीविषयक उपचारादरम्यान देण्यात आल्याचे वृत्त समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या माहितीनंतर औषध नियंत्रण विभागाने तात्काळ त्या ठिकाणच्या बॅचेसमधील नमुनेही गोळा केले आहेत; तथापि, त्यांच्या विश्लेषणाचे निष्कर्ष अद्याप सार्वजनिक करण्यात आलेले नाहीत. 

हेही वाचा – Viral Video : गप्पा रंगल्या, खळखळून हसली, इतकं की डोळ्यात आलं पाणी; त्या महिला पोलीस अधिकारीच्या असंवेदनशीलतेवर नेटिझन्स नाराज

केवळ विशिष्ट बॅचवर बंदी; यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश
औषध नियंत्रण विभागाने स्पष्ट केले आहे की, सध्या ज्या इंजेक्शनवर बंदी घालण्यात आली आहे, ती केवळ 5 मि.ली. प्रकारातील एका विशिष्ट बॅचपुरतीच मर्यादित आहे, सर्व प्रकारच्या ऑक्सिटोसिनवर नाही. मात्र, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विभागाने राज्यातील सर्व संबंधित रुग्णालयांना, औषध विक्रेत्यांना आणि संस्थांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत, तसेच त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सध्याच्या औषध साठ्याचा तात्काळ आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number