मुंबई: उद्या म्हणजे 12 फेब्रुवारी 2026 रोजी बँकेशी संबंधित एखादं महत्त्वाचं काम करण्याचा तुमचा विचार असेल, तर ही बातमी नक्की वाचा. देशातील प्रमुख बँक कर्मचारी संघटनांनी एकदिवसीय राष्ट्रव्यापी संपाची घोषणा केली आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे उद्या बँका बंद राहणार का?
Reserve Bank of India (RBI) च्या अधिकृत सुट्टीच्या कॅलेंडरनुसार 12 फेब्रुवारीला कोणतीही सरकारी सुट्टी नाही. मात्र All India Bank Employees Association (AIBEA), All India Bank Officers Association (AIBOA) आणि Bank Employees Federation of India (BEFI) या संघटनांनी त्यांच्या सदस्यांना संपात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. नवीन लेबर कोडविरोधात तसेच पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा आणि चांगल्या वर्क लाईफ बॅलन्सच्या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.
हेही वाचा: Nashik News : नाशिककरांची कोंडी फुटणार! द्वारका ते नाशिकरोड रस्ता आता 'दहा पदरी' होणार; कुठून कुठे जातो हा मार्ग?
State Bank of India (SBI) आणि Bank of Baroda यांनी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत सेवा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले असले तरी कर्मचारी अनुपस्थितीमुळे व्यवहारात उशीर होऊ शकतो. IDBI Bank ला देखील संपाची नोटीस मिळाली आहे. त्यामुळे चेक क्लिअरन्स, रोख रक्कम काढणे, कर्जासंबंधी प्रक्रिया यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
तथापि, दिलासा देणारी बाब म्हणजे Net Banking, Mobile Banking आणि UPI (Unified Payments Interface) सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील. उद्या ATM मध्येही कॅश तुटवडा अपेक्षित नाही. मात्र प्रत्यक्ष शाखेत जाऊन काम करायचे असल्यास आधी संबंधित शाखेशी संपर्क साधणे योग्य ठरेल.
थोडक्यात सांगायचं तर बँका पूर्णपणे बंद नसतील, पण कामकाजात विलंब होऊ शकतो. त्यामुळे शक्य असल्यास आजच तुमची महत्त्वाची बँकिंग कामे पूर्ण करा आणि उद्याच्या संभाव्य अडचणी टाळा.
हेही वाचा: Actor Govinda on Politics: "राजकारण सोडलं कारण..." प्रसिद्ध अभिनेते गोविंदाने अखेर मौन सोडलं; मनातील खदखद व्यक्त केली