Beating Retreat Ceremony: प्रजासत्ताक दिनानिमित्त अटारी बॉर्डरवर ‘बीटिंग द रिट्रीट’ सोहळा; पाहा खास व्हिडीओ

सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी आपल्या अंगावर काटा आणणाऱ्या गर्जना आणि शिस्तबद्ध संचलनाने उपस्थित हजारो नागरिकांच्या मनात देशप्रेम जागे झाले.

Beating Retreat Ceremony: प्रजासत्ताक दिनानिमित्त अटारी बॉर्डरवर ‘बीटिंग द रिट्रीट’ सोहळा; पाहा खास व्हिडीओ

Beating Retreat Ceremony: प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत अटारी-वाघा बॉर्डरवर पार पडलेला ‘बीटिंग द रिट्रीट’ सोहळा यंदा अभूतपूर्व देशभक्तीच्या वातावरणात संपन्न झाला. सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी आपल्या अंगावर काटा आणणाऱ्या गर्जना आणि शिस्तबद्ध संचलनाने उपस्थित हजारो नागरिकांच्या मनात देशप्रेम जागे झाले. मात्र, वाढत्या सुरक्षा धोक्यांच्या पार्श्वभूमीवर यंदा सीमेवरील पारंपरिक मिठाईची देवाणघेवाण आणि दरवाजे उघडण्याचे सोपस्कार रद्द करण्यात आले होते.

20 हजार प्रेक्षकांचा जनसागर आणि महिला शक्तीचे दर्शन

या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून आलेल्या 20 हजारांहून अधिक नागरिकांनी गॅलरी हाऊसफुल्ल केली होती. संचलनामध्ये पुरुषांच्या बरोबरीने बीएसएफच्या महिला अधिकाऱ्यांनीही अत्यंत ताठ मानेने आणि आक्रमक पवित्र्यात भाग घेत ‘नारी शक्ती’चे दर्शन घडवले. ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणांनी संपूर्ण सीमा परिसर दुमदुमून गेला होता.

हेही वाचा – Antiship Hypersonic Missile: आता खैर नाही; प्रजासत्ताक दिनी DRDO ने जगाला दाखवले भारताचे ‘हायपरसोनिक’ मिसाइल

दहशतवादी हल्ल्याचे सावट; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर कडक सुरक्षा

यंदाचा सोहळा इतर वर्षांच्या तुलनेत अधिक सावध वातावरणात पार पडला. कारण, पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि सुरू असलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर होत्या. सुरक्षेच्या कारणास्तव भारत-पाकिस्तान सीमेवरील मुख्य दरवाजे यंदा उघडण्यात आले नाहीत. दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये होणारी मिठाईची देवाणघेवाणही यंदा टाळण्यात आली.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number