CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठा निर्णय! 9 आणि 10 ऑक्टोबरला ड्राय डे जाहीर

CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
Delhi Dry Day

CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आज दिनांक 9 ऑक्टोबर आणि उद्या 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीत ड्राय डे घोषित करण्यात आला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभारावर आक्षेप घेत त्यांना तात्काळ अटक करण्याची आणि राजीनामा देण्याची मागणी CJP आंदोलकांनी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्या 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतर मंतर येथे CJP चे मोठे आंदोलन होणार आहे.

सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी निर्णय
दिल्ली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. अधिकृत आदेशानुसार, 10 ऑक्टोबर रोजी जंतर मंतर येथे होणाऱ्या नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दारूची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.

हेही वाचा – ‘एवढीच भीती वाटते तर अख्खा देश बंद करा’ अभिजित दीपकेंचा सरकारवर हल्लाबोल

दिल्लीत 2 दिवस दारूबंदी का?
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, राजधानीतील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांच्या बंदचे आदेश देण्यात आले आहेत. SIR प्रक्रियेसंबंधित आरोपांवरून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधी पक्ष आणि इतर गटांनी आंदोलन छेडले आहे. या गटांचा आरोप आहे की, मतदार यादी सुधारणा प्रक्रियेदरम्यान लाखो मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. नागरिकांसाठी न्याय मिळवून देण्याकरिता (CJP) या संघटनेने 10 ऑक्टोबर रोजी जंतर मंतर येथे आंदोलनाचे आवाहन केले आहे. या मागणीला अनेक विद्यार्थी संघटनांनीही पाठिंबा दिला आहे.

नियोजित गर्दी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 9 आणि 10 ऑक्टोबर रोजी दारू विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version