Sunday, February 16, 2025 10:52:13 AM

Bhaav 2025- Mahakumbha of Art and Culture
भाव 2025- कला आणि संस्कृतीचा महाकुंभ

भारतातील सर्वात मोठ्या कला आणि सांस्कृतिक एकोप्याच्या उत्सवाबद्दल तुम्हाला माहित असावीत ही 10 तथ्ये...

भाव  2025- कला आणि संस्कृतीचा महाकुंभ

उत्तरप्रदेश : भारताच्या कला आणि सांस्कृतिक परंपरेला समृद्ध करण्यात तृतीयपंथी कलाकार आणि समुदायांच्या अद्वितीय योगदानाचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि त्यांना दाद देण्यासाठी पद्मश्री मंजम्मा जोगाठी आणि राणी को-हे-नूर या नावाने ओळखले जाणारे सुशांत दिवगीकर यांची कला आणि त्यांची मुलाखत,  पद्मविभूषण सोनल मानसिंग, पद्मश्री उमा माहेश्वरी, पद्मश्री ओमप्रकाश शर्मा, पद्मश्री वामन केंद्रे, 93 वर्षीय नामवंत वीणावादक उस्ताद आर.-विश्वेश्वरन, 88 वर्षीय  प्राचीन मृदंगम वादक विद्वान ए.व्ही. आनंद अशा 70 हून अधिक दिग्गजांचे कला सादरीकरण, माहितीपूर्ण विवेचन आणि ख्यातनाम वक्त्यांचे वक्तृत्व या सर्वांचे साक्षीदार होण्यासाठी, केवळ पारंपारिक कलाप्रकारांचाच नव्हे तर समकालीन कलेचाही एक नावीन्यपूर्ण अनोखा  उत्सव म्हणून 23 ते 26 जानेवारी दरम्यान आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटर येथे तिसऱ्या वेळी आयोजित होणाऱ्या भाव-द एक्स्प्रेशन्स समिट 2025 हा तिथे येणारे 600 प्रतिनिधी आणि कलाकारांसाठी एक अद्वितीय आणि आगळावेगळा अनुभव देणारा असेल. जे त्यांच्या कला प्रकारांमध्ये आकंठ रममाण होतील, आपली कला सादर करतील, शिकवतील आणि एकमेकांकडून शिकतीलही. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

भारतीय संस्कृती आणि कलाकारांना निर्विवाद पाठिंबा देणाऱ्या या कार्यक्रमात केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत हे देखील शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा : महाकुंभात भक्तिमय वातावरणात शाहीस्नान
 

 या वर्षीच्या भारतातील सर्वात मोठ्या कला आणि सांस्कृतिक एकोप्याच्या उत्सवाबद्दल तुम्हाला माहित असावीत अशी 10 तथ्ये येथे देत आहोत:

1.  दिग्गजांच्या कामगिरीची विलक्षण शृंखला

यावर्षी भाव येथील कला सादरीकरण आणि माहितीपूर्ण विवेचनात पद्मविभूषण सोनल मानसिंग, पद्मश्री उमा माहेश्वरी, पद्मश्री ओमप्रकाश शर्मा, पद्मश्री वामन केंद्रे, 93 वर्षीय वीणा वादक आर. विश्वेश्वरन आणि डाव्या हाताने मृदंगम वाजविणाऱ्या मोजक्या कलाकारांपैकी एक 88 वर्षीय श्रीयुत ए. व्ही. आनंद, जगातील पहिली व्यावसायिक महिला तबला वादक अनुराधा पाल, दिग्गज वीणा वादक आर विश्वेश्वरन, नामवंत कुचीपुडी नृत्यांगना सुनंदा देवी, कर्नाटकी संगीत विशेषज्ञ राजम शंकर, प्रख्यात कथ्थक नृत्यांगना मनीषा साठे, कवी, लेखक आणि पत्रकार आलोक श्रीवास्तव, लोककलावंत डॉ. गणेश चंदनशिवे यांच्यासह इतर अनेक दिग्गजांचा समावेश आहे.

2. भारतातील प्रस्थापित कलाकार आणि नवोदित प्रतिभा आणि उदयोन्मुखांचा सांस्कृतिक मेळा

सांस्कृतिक आणि अभिजात कला महोत्सवांत बहुदा आढळून येणारा भेदभाव पूर्णपणे टाळत, भाव हा महोत्सव दिग्गज, प्रख्यात आणि नवोदित तसेच प्रामाणिक उदयोन्मुख कलाकार आणि विद्यार्थ्यांना तीन दिवसासाठी त्यांच्या कला प्रकाराचे वैभव सामायिकरित्या आणि आनंदाने साजरे करण्यासाठी एकत्र आणत आहे.

3.  समकालीन कला प्रकारांनाही वाव मिळेल

खऱ्या अर्थाने अनोखा आणि आगळावेगळ्या असलेल्या या महोत्सवात समकालीन कलाकार देखील आपली कला सादर करताना आणि आपल्या कलेबाबत चर्चा करताना दिसतील. ज्यात शास्त्रीय कथ्थक तसेच कथ्थकवर आधारित समकालीन नृत्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या आदिती मंगलदास सारख्या कलाकारांसह इतरांचा समावेश असेल.

4.  भाव एक्स्पो 2025- भारतीय हस्तकला आणि परफॉर्मन्स आर्ट्समधील सर्वोत्तमाचा वेध घेण्यासाठी आणि शिकण्यासाठी

भाव एक्स्पो 2025 समृद्ध भारतीय हस्तकलेचे संवर्धन करण्यासाठी आणि त्याला चालना देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या स्वदेशी उद्योजक आणि कलाकारांच्या कार्यांवर प्रकाश टाकेल.  इतकंच नाही तर, एक्स्पो तुम्हाला मधुबनीपासून ते कलमकारी, केरळ म्युरल पेंटिंग, वारली, गोंड आर्ट, पट्टचित्र, म्हैसूर पेंटिंगपर्यंतच्या विविध कलात्मक शैलींबद्दल जाणून घेण्यासाठी त्या क्षेत्रातील तज्ञांच्या कार्यशाळा आयोजित करत आहे आणि त्या खरेदीचा अनोखा आनंद घेता येईल. आकर्षक हस्तकला, हातमाग, सौंदर्य उत्पादने, ॲक्सेसरीज, पोशाख, सजावटीच्या वस्तू आणि पारंपारिक पदार्थांच्या भव्य मेळ्यात रममाण व्हा.

भारताच्या सांस्कृतिक कलेच्या उत्कंठावर्धक प्रदर्शनात, तुम्ही मंत्रमुग्ध करणारे आदिवासी नृत्य सादरीकरण, कर्नाटक संगीताचा साज असलेली मनस्वी त्यागराजा आराधना, अचंबित करणारी केरळची मुथप्पन थेय्यम आणि प्राचीन ज्ञान आणि त्याचे आधुनिक काळाशी तादात्म्य दाखवणारे प्रबोधनात्मक संस्कृत भाषेतील प्रदर्शन यापासून सर्व काही पाहू शकता. 


5. 20 संगीत वाद्ये तसेच लोकनृत्य आणि शास्त्रीय नृत्य प्रकारांचे मेळ

भावमध्ये तबला, पखावज, मृदंगम, ढोलक, सारंगी, हार्मोनियम, सतार, वीणा, बासरी, सॅक्सोफोन आणि जिओ श्रेड यासह 20 हून अधिक वाद्यांचे मंत्रमुग्ध करणारे मिश्रण असेल.

या महोत्सवात सादर करण्यात येत असलेल्या नृत्य प्रकारांपैकी कथ्थक, भरतनाट्यम, कुचीपुडी, ओडिसी, मोहिनीअट्टम, कथकली, सत्तरिया आणि मणिपुरी नृत्ये सादर होत आहेत. तसेच छाऊ, लावणी, गरबा तसेच यांसारख्या कर्नाटक आणि महाराष्ट्रातील इतर 7-8 लोकनृत्य प्रकारांना स्थान दिले जात आहे.

6. कला प्रकारांचे पुनरुज्जीवन
 भाव येथे, आपण मध्य प्रदेशातील माच - लोकनृत्य-नाटिका, जी पारंपारिकपणे पुरुषांद्वारे सादर केली जाते, पण यावेळी महिलांद्वारे सादर केली जात आहे त्याबद्दल जाणून घेऊ.  माच ही खरोखरच एक अद्वितीय आणि लयास जात असलेली लोक परंपरा आहे.

भारताच्या सांस्कृतिक परंपरांमध्ये तृतीयपंथी समुदायाचे योगदान साजरे केले जात आहे 

जोगाठी नृत्य परंपरेला जागतिक व्यासपीठावर नेणारे आणि कर्नाटक जनपद अकादमीचे (राज्यातील परफॉर्मिंग आर्ट्ससाठीची सर्वात प्रतिष्ठित संस्था) प्रथम तृतीयपंथी अध्यक्ष पद्मश्री मंजम्मा जोगाठी यांसारख्या कलाकाराचा महत्त्वपूर्ण सहभाग आणि मुलाखत घेत, भाव हा महोत्सव तृतीयपंथी समुदायाच्या अद्वितीय योगदानाची दाद देत हा उत्सव साजरा करेल.  सुशांत दिवगीकर ज्यांना राणी को-हे-नूर म्हणूनही ओळखले जाते, ते ही या महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. भाव मध्ये कोलकाता येथील रात्र दास यांच्या नेतृत्वाखाली 10 तृतीयपंथी कलाकारांच्या सप्तमातृका या भरतनाट्यम नृत्याचे सादरीकरण होईल.

7. वयाचे बंधन नाही 

 कलात्मक वारसा सांगणारा आणि खरोखरच वयाचे बंधन नसलेला हा उत्सव भाव मध्ये 93 वर्षांच्या ज्येष्ठ वीणा कलाकार आहेत. त्यांना कलासारथी पुरस्कार प्राप्त होणार आहे. तसेच 8-9 वर्षाचा विलक्षण प्रतिभा आणि शिकण्याची जिज्ञासा असलेला नवोदित कलावंत देखील आहे.

8.  नाट्य कला प्रकारांना येथे अभिव्यक्ती मिळेल

 भाव या वर्षी रंगभूमीवरील दिग्गज कलावंत आणि लोक आणि समकालीन रंगभूमीला जागतिक स्तरावर नेणारे कलाकार, भारतीय नाट्यकलेचा प्रचार करण्यासाठी वर्षानुवर्षे घालवलेले कलाकार, पद्मश्री ओमप्रकाश शर्मा, माच हा रंगभूमीचा प्रकार सादर करतील. ही कला मुख्यत्वे पुरुषांद्वारे सादर केली जात असे, त्यात आता महिला कलाकार देखील सहभाग  घेत आहेत. त्यात मध्य प्रदेशातील दुर्मिळ दैवी कथांचा अंतर्भाव आहे. तसेच भारतीय नाट्य व्यक्तिमत्व आणि अभ्यासक, डोगरी थिएटरला आंतरराष्ट्रीय पातळीवर आणण्यासाठी ओळखले जाणारे पद्मश्री बळवंत ठाकूर, आणि रंगभूमीचे प्रस्थापित व्यक्तित्व, NSD चे माजी संचालक पद्मश्री वामन केंद्रे यांचाही सहभाग असेल.

9. संस्कृती आणि अध्यात्म यांचे मिश्रण

 भाव हे केवळ सांस्कृतिक सादरीकरण आणि अभिव्यक्तीचे व्यासपीठ नाही, तर ते कलाकारांना स्वत:ला जाणून घेण्यासाठी एक ताजे आणि चैतन्यदायी वातावरण प्रदान करते आणि त्याचा स्रोत जिथून सर्व सर्जनशीलता निर्माण होते, ते या वर्षीच्या थीममध्ये प्रतिबिंबित होते - “आंतरिक शांती  आणि बाह्य चैतन्य," ज्याद्वारे केंद्रित होत सर्जनशीलतेद्वारे भावपूर्ण कलात्मकतेचे पोषण करण्यावर लक्ष केंद्रित करेल.  उत्सवाची प्रत्येक दिवसासाठी एक अनोखी थीम असेल:

 24 जानेवारी – अभिव्यक्ती 
25 जानेवारी – अधिगती (शिकण्याचा आनंद)
26 जानेवारी – अनुभूती

10.  दैवी समीकरणे


भावमध्ये संगीतकार सम्राट चित्रविणा एन. रविकिरण यांच्या नेतृत्वाखालील 30 कलाकारांचे भव्य संगीत संयोजन आणि देखणे सादरीकरण देखील असेल.


सम्बन्धित सामग्री