सोमवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान एका वकिलाने भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बुट फेकण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. समोर आलेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीने कोर्टात घोषणाबाजीही केली. नंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला बाहेर काढले. सर्वोच्च न्यायालयात सोमवारी एक धक्कादायक प्रकार घडला. एका वकिलाने भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बुटाने हल्ला केला. त्यामुळे, देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. या घटनेप्रकरणी, सोमवारी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या बंधूंनीही तीव्र निषेध नोंदवले.
या घटनेची दृश्य समाजमाध्यमांत वेगाने व्हायरल होत आहेत. न्यायालयातील सुनावणीच्या दरम्यान नक्की काय घडलं हे बघायला मिळत आहे.