Friday, July 11, 2025 11:34:17 PM

मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे अहमदाबाद विमान अपघातात निधन

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील या विमानात होते. मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.

मोठी बातमी माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे अहमदाबाद विमान अपघातात निधन
Vijay Rupani
Edited Image

अहमदाबाद: अहमदाबादमधून मोठी बातमी समोर येत आहे. येथे दुपारच्या सुमारास एअर इंडियाचे विमान कोसळले. या अपघाताने संपूर्ण देश हादरून गेला आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील या विमानात होते. मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. माजी मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त, अपघातावेळी विमानात 242 प्रवासी होते. 

कोण आहेत विजय रुपाणी?

विजय रुपाणी हे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री होते. विजय रुपाणी यांचा जन्म रंगून येथे झाला. राजकीय अस्थिरतेनंतर त्यांचे कुटुंब 1960 मध्ये गुजरातमधील राजकोट येथे स्थलांतरित झाले. रुपाणी शाळेत असतानाच आरएसएस शाखेत सामील झाले. त्यानंतर ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भाजपमध्ये सामील झाले.

हेही वाचा -  ब्रेकिंग! एअर इंडिया विमानातील सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू; DNA चाचणीनंतर पटणार मृतदेहांची ओळख

विजय रुपाणी यांनी 2014 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली आणि राजकोट पश्चिम येथून पोटनिवडणूक जिंकली. 2006 ते 2012 पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य देखील होते. विजय रुपाणी यांनी 2016 ते 2021 पर्यंत गुजरातचे 16 वे मुख्यमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या बातम्या आल्यानंतर सर्वांनाचं मोठा धक्का बसला. या विमानाने विजय रुपाणी देखील लंडनला जात होते. परंतु, दुर्दैवाने या विमान अपघातात रुपाणी यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाचे त्यांच्या कुटुंबियांना आणि कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे.  

हेही वाचा - Aeroplane Black Box: ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? ज्यावरून उलगडणार अहमदाबाद विमान अपघाताचे सत्य

दरम्यान, विमान अपघातानंतर एअर इंडियाने एक निवेदन जारी केले आहे. एअर इंडियाच्या म्हणण्यानुसार, विमान अहमदाबादहून लंडनला रवाना झाले. तथापि, गुरुवारी दुपारी 1:38 वाजता उड्डाण घेतल्यानंतर 5 मिनिटांनी, विमान एका निवासी भागात कोसळले. विमानाचे नेतृत्व कॅप्टन सुमित सभरवाल यांनी केले होते. कॅप्टन सुमित सभरवाल यांना 8200 तासांचा उड्डाणाचा अनुभव आहे. त्याच वेळी, त्यांच्या सह-वैमानिकाला 1100 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता.
 


सम्बन्धित सामग्री