Ahmedabad Plane Crash: गुजरातमधील अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान टेकऑफनंतर लगेचच कोसळले. या विमानात क्रू मेंबर्ससह 242 लोक होते. अपघातानंतर लगेचच घटनास्थळी पोहोचलेल्या मदत आणि बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केले आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील अपघातग्रस्त विमानात होते.
विमान अपघातानंतर या विमानातील प्रवाशांची यादीही समोर आली आहे. एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानात एकूण 230 प्रवासी होते. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचेही नाव या विमानातील प्रवाशांच्या यादीत आहे. विजय रुपाणी यांचे नाव प्रवाशांच्या यादीत 12 व्या क्रमांकावर आहे आणि त्यांचा सीट क्रमांक 2डी आहे.
हेही वाचा - तात्काळ तिकिटासाठी 'आधार प्रमाणीकरण' कसे करावे? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
प्राप्त माहितीनुसार, दुपारी 1:38 वाजता अहमदाबादमधील सरदार पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हे विमान लंडनसाठी निघाले होते, हे विमान विमानतळाची सीमाही ओलांडू शकले नाही. दुपारी 1:40 वाजता एअर इंडियाचे हे विमान कोसळले आणि अहमदाबादच्या आकाशात धुराचे लोट पसरले. गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी अपघाताबाबत फोनवरून चर्चा केली आहे.
हेही वाचा - राजा रघुवंशी हत्याकांडात सर्वात मोठा खुलासा! सोनमने स्वतः दरीत फेकला होता पतीचा मृतदेह
दरम्यान, मदत आणि बचावकार्यासाठी अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती बचाव दलाच्या (एनडीआरएफ) पथकांनीही घटनास्थळी पोहोचून मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे. अहमदाबादमधील सर्व रुग्णालयांना सतर्क करण्यात आले आहे.