Vande Bharat : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस रुळावर; मुंबईला जोडणार का? जाणून घ्या वेळापत्रक

Vande Bharat Express : रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता रेल्वे मार्गावर आणखी एक वंदे भारत धावणार आहे. मात्र, ही नवीन वंदे भारत एक्स्प्रेस नेमकी कोणत्या मार्गावर धावणार आहे, जाणून घ्या.

Vande Bharat : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस रुळावर; मुंबईला जोडणार का? जाणून घ्या वेळापत्रक
आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस धावणार

गेल्या काही दिवसांमध्ये वंद भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सातत्याने वाढताना दिसतेय. अत्याधुनिक सुविधा, प्रवासाचा कमी वेळ आणि आरामदायी प्रवासामुळे वंदे भारतला असंख्य प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळतोय. सध्या महाराष्ट्रातही काही मार्गांवर वंदे भारत धावत असून, या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, राज्यातील वंदे भारत गाड्यांची संख्या अजूनही मर्यादित आहे. अशातच रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता रेल्वे मार्गावर आणखी एक वंदे भारत धावणार आहे. मात्र, ही नवीन वंदे भारत एक्स्प्रेस नेमकी कोणत्या मार्गावर धावणार, तिचे थांबे कोणते असतीस, याबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या.

कोणत्या मार्गावर जाणार?
मिळालेल्या माहितीनुसार, उदयपूर-असरवा वंदे भारत एक्स्प्रेसचा आता थेट सुरतपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 3 ऑक्टोबरपासून ही ट्रेन नियमित सुरतपर्यंत धावणार आहे. नव्या निर्णयामुळे मेवाडला सुरतशी थेट आणि वेगवान रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळेल.

जाणून घ्या वेळापत्रक
आता ही नवी वंदे भारत एक्स्प्रेस मंगळवार सोडून आठवड्यातील 6 दिवस धावणार आहे. 2 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी ही वंदे भारत एक्स्प्रेस उद्यपूरमध्ये दाखल होईल, त्याच दिवशी उदयपूर स्टेशनवर तिचे भव्य स्वागतही केले जाईल. त्या रात्री ट्रेनचा मुक्काम हा उदयपूरमध्ये होईल आणि 3 ऑक्टोबरपासून ती नव्या वेळापत्रकानुसार सुरतच्या दिशेने रवाना होील.

नव्या वेळापत्रकानुसार, वंदे भारत एक्स्प्रेस ही दुपारी 3 वाजून 35 मिनिटांनी निघेल आणि त्यानंतर 4.03 मिनिटांनी जावर, 4.50 वाजता डुंगरपूर, 5.27 वाजता शामलाजी रोड, 6.18 वाजता हिम्मतनगर तसेच 7.25 ला असरवा येथे पोहोचणार आहे. असरवा येऊन रात्री पुढे 8.58 वाजता मणिनगर, 9.50 वाजता आणंद आणि 10.22 वाजता भरुच येथे स्टॉप घेऊन रात्री 11 वाजता सुरतला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही ट्रेन सुरतहून सकाळी 6.10 वाजता सुटेल आणि दुपारी 1.40 मिनिटांनी उदयपूरला पोहोचेल, त्यामुळे आता दोन्ही शहरांदरम्यान प्रवास करणे अधिस सोयीचे होणार आहे.

वेटिंग आणि बसच्या त्रासातून सुटका
एवढेच नाही तर या विस्तारामुळे फक्त उदयपूर ते सुरत नाही तर दक्षिण भारतात जाणाऱ्या असंख्य प्रवाशांनाही मोठा फायदा होणार आहे. आतापर्यंत मेवाडमधील बऱ्याच प्रवाशांना सुरतला जाण्यासाठी बसचा पर्याय घ्यावा लागत होता. तर बस आणि पुढील रेल्वेच्या वेळा न जुळल्याने शिवाय रेल्वेत वेटिंग लिस्ट असल्याने प्रवाशांचे हाल होत होते. मात्र, आता थेट वंदे भारत सेवा सुरु झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number