Delhi Blast Update : मोठा खुलासा! देशातील ‘ही’ शहरेही होती हिटलिस्टवर; स्लीपर मॉड्यूल करण्यात आले होते सक्रिय

अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या आरोपींचे मॉड्यूल फक्त दिल्लीपुरते मर्यादित नव्हते. त्यात दोन मोठ्या शहरांचा समावेश होता.

Delhi Blast Update : मोठा खुलासा! देशातील ‘ही’ शहरेही होती हिटलिस्टवर; स्लीपर मॉड्यूल करण्यात आले होते सक्रिय

Delhi Blast Update: दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबर रोजी घडलेला कार स्फोटामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. स्फोटामुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. सुरक्षा सूत्रांच्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या आरोपींचे मॉड्यूल फक्त दिल्लीपुरते मर्यादित नव्हते, तर उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळे आणि मंदिरे, विशेषतः अयोध्या आणि वाराणसीला लक्ष्य करण्यासाठी तयार करण्यात आले होते.

हेही वाचा – Delhi Blast Update : दिल्ली स्फोटप्रकरणात नवे धागेदोरे समोर; फॉरेन्सिक तपासात आढळले अमोनियम नायट्रेट आणि उच्च दर्जाचे विस्फोटक

अयोध्येत स्फोट घडवण्याचा आरोपींचा मानस असल्याचे स्पष्ट झाले आहे. अटक केलेल्या शाहीनने अयोध्येत स्लीपर मॉड्यूल सक्रिय केले होते, परंतु पोलिसांच्या छापेमारीत स्फोटके जप्त करण्यात आली, ज्यामुळे मोठा अपघात टाळला गेला, असं सांगितलं. स्फोटाच्या तपासात असेही दिसून आले आहे की, लाल किल्ल्यावर घडलेल्या स्फोटासाठी कोणतीही टायमर किंवा इतर अत्याधुनिक उपकरणांचा वापर केला गेला नव्हता. यावरून असे स्पष्ट होते की स्फोट घाईघाईत करण्यात आला होता. चौकशीतून असेही समोर आले की, या मॉड्यूलचा उद्देश रुग्णालये आणि गर्दीची ठिकाणे लक्ष्य करून जास्तीत जास्त नुकसान करण्याचा होता.

हेही वाचा – Islamabad Blast Update : शहबाज शरीफची खेळी!; पुराव्याविना पाकिस्तानचा पुन्हा भारतावर आरोप, परराष्ट्र मंत्रालयानं चांगलंच फटकारलं

या प्रकरणातील तीन मुख्य संशयितांमध्ये डॉ. मुझम्मिल, डॉ. आदिल अहमद दार आणि डॉ. उमर यांचा समावेश आहे. स्फोटाच्या वेळी डॉ. उमर यांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे, तर डॉ. मुझम्मिल आणि डॉ. आदिल अहमद दार यांना अटक करण्यात आले आहे. सध्या सुरक्षा दल घटना स्थळी आणि संबंधित ठिकाणी तणाव कमी करण्यासाठी आणि पुढील कटांना रोखण्यासाठी सतत कारवाई करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number