Special Train : रेल्वेचा मोठा निर्णय! दिवाळी-छठपूजेसाठी स्पेशल ट्रेन धावणार, कधी आणि कुठून किती वाजता सुटणार?

दिवाळी आणि छठपूजेच्या दरम्यान उत्तर भारतामध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढते. ही वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे.

Special Train : रेल्वेचा मोठा निर्णय! दिवाळी-छठपूजेसाठी स्पेशल ट्रेन धावणार, कधी आणि कुठून किती वाजता सुटणार?

मुंबई : दिवाळी आणि छठपूजेच्या दरम्यान उत्तर भारतामध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढते. ही वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस अर्थात LTT या स्थानकावरुन वाराणसी आणि सुलतानपूरसाठी तब्बल 16 अतिरिक्त विशेष गाड्यांची सेवा सुरु करण्यात येणार आहे तर साईनगर शिर्डी-बिकाने आणि सोलापूर-अजमेर या विशेष गाड्यांच्या 34 सेवांना ही मुतदवाढ देण्यात आलेली आहे. चला तर मग जाणून घेऊयात, कधीपासून प्रवाशांना या विशेष सेवेचा फायदा घेता येणार आहे.

जाणून घ्या तारीख आणि वेळ
मिळालेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 04225/04226 एलटीटी-वाराणसी विशेष गाडी ही 23 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान दर शुक्रवारी एलटीटी या स्थानकातून सुटेल. परतीची गाडी ही 22  ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर दरम्यान दर गुरुवारी वाराणसीहून धावेल. या एक्स्प्रेसला ठाणे, कल्याण, इगतपुरी तसेच नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, राणी कमलापती, झाशी,कानपूर,लखनौ, सुलतानपूर आणि जौनपूर सिटीसह या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे असणार आहेत.

दुसरीकडे, गाडी क्रमांक 04211/04212 एलटीटी-सुलतानपूर ही विशेष गाडी 22 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर दरम्यान दर गुरुवाती एलटीटी स्थानकाहून धावेल, तर परतीचा प्रवास हा 21 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबरदरम्यान दर बुधवारी सुलतानपूरहून असेल. या दरम्यान, साईनगर शिर्डी-बिकाने या विशेष गाडीच्या 18 आणि सोलापूर-अजमेर विशेष गाडीच्या 16 सेवांनाही मुदतवाढ दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे या गाड्यांच्या वेळापत्रकात, मार्गात, थांब्यांमध्ये कोणताही  बदल नाही. या विशेष गाड्यांचे आरक्षण हे 19 सप्टेंबरपासून, तर एलटीटी-वाराणसी आणि एलटीटी-सुलतानपूर विशेष गाड्यांसाठीचे आरक्षण 20 सप्टेंबर म्हणजेच आजपासून पीआरएस केंद्रे, आयआरसीटीसीवर उपलब्ध होणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number