Monday, December 08, 2025 07:38:57 AM

Bihar Assembly Elections 2025: बिहारमध्ये NDA पुढे; केला 150 चा टप्पा पार, BJP - JDU ने वाढवलं टेन्शन

महागठबंधन अंतिम निकाल आपल्या बाजूने फिरतील असा दावा करत आहे. अनेक मतदारसंघांत चुरशीची लढत सुरू असून निकाल राज्याची दिशा ठरवणार आहेत.

bihar assembly elections 2025 बिहारमध्ये nda पुढे केला 150 चा टप्पा पार bjp - jdu ने  वाढवलं टेन्शन

बिहार विधानसभा निवडणूक 2025 च्या मतमोजणीला आज सुरुवात झाली असून प्राथमिक संकेतांनुसार राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मोठी आघाडी घेताना दिसत आहे. राज्यातील 243 जागांसाठी झालेल्या मतदानानंतर सर्वांच्या नजरा आज घोषीत होणाऱ्या निकालांवर खिळल्या आहेत. बहुमतासाठी 122 जागांची गरज असून सुरुवातीच्या टप्प्यातच NDA ने 150 जागांचा टप्पा ओलांडल्याचे दिसत आहे. BJP आणि JDU दोन्ही पक्षांनी 60 हून अधिक जागांवर मजबूत सुरुवात केली आहे. त्यामुळे NDA कार्यालयात उत्साहाचे वातावरण आहे. दुसरीकडे महागठबंधनने विश्रांतीपूर्वीच दावा केला आहे की अंतिम निकाल त्यांच्या बाजूनेच फिरतील.

JDU नेते संजय झा यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की “परिस्थिती आमच्या अपेक्षेप्रमाणे आहेत आणि आम्हाला मिळत असलेला फीडबॅकही NDA च्या स्पष्ट बहुमतीकडेच निर्देश करतो.” दरम्यान अनेक मतदारसंघांत रंजक लढती पाहायला मिळत आहेत. कुचायकोट येथून JDU चे उमेदवार आघाडीवर आहेत, तर धमदाहा येथून लेसी सिंह पुढे आहेत. कांटी येथून JDU चे अजीत कुमार आघाडी घेत आहेत. जहानाबादमध्ये दुसऱ्या फेरीच्या मोजणीनंतर राहुल शर्मा पुढे असल्याचे संकेत आहेत. कुढ़नी मतदारसंघात BJP चे केदार प्रसाद गुप्ता यांनी आघाडी अधिक मजबूत केली आहे. पटनाातील कुम्हरारमधून BJP चे संजय कुमार यांना सुरुवातीच्या टप्प्यातच मोठी आघाडी मिळाल्याचे दिसत आहे.

दानापुरमध्ये RJD चे रीतलाल यादव आघाडीवर आहेत, तर दानापुरमधूनच BJP चे रामकृपाल यादव मागे आहेत. बनियापुर सीटवर RJD ने आघाडी घेतली आहे. सुरुवातीच्या या रुझानांमुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. सर्व 243 मतदारसंघांमधील प्राथमिक संकेत जाहीर झाले असून सुरुवातीच्या फरकावरून अंतिम निकालांची दिशा काय असेल हे काही प्रमाणात स्पष्ट होऊ लागले आहे. तरीदेखील मतमोजणीची अनेक फेऱ्या बाकी असल्याने कोणताही पक्ष अजूनही सावध भूमिकेत आहे. ही निवडणूक राज्याची दिशा बदलणारी ठरणार का किंवा नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली NDA पुन्हा सत्तेत परतणार, याचे चित्र पुढील काही तासांत समोर येईल.

हेही वाचा: Bihar Assembly Elections 2025 : 'टायगर अभी जिंदा है!'; नितीश कुमार समर्थकांची बॅनरबाजी


सम्बन्धित सामग्री