बिहार विधानसभा निवडणूक 2025 मध्ये NDA ने विक्रमी विजय मिळवला, तर महागठबंधनला मोठा धक्का बसला. या व्यापक निकालांच्या दरम्यान पाच महत्त्वाच्या मतदारसंघांत अतिशय अल्प मतांनी निर्णय लागल्याने राजकीय तापमान अधिकच वाढले. सर्वात चुरशीची लढत संदेश मतदारसंघात पाहायला मिळाली. येथे JDU चे राधा चरण साह यांनी केवळ 27 मतांच्या फरकाने विजय मिळवला. साह यांना 80,598 मते मिळाली, तर RJD चे दीपू सिंह 80,571 मतांवर थांबले. अल्प फरकाचा दुसरी लढत अगिआंव मतदारसंघात दिसली. येथे BJP चे महेश पासवान यांनी फक्त 95 मतांनी विजय मिळवला. त्यांना 69,412 मते मिळाली, तर CPI (ML) चे शिव प्रकाश रंजन 69,317 मतांवर अतिशय जवळ होते.
तिसरा रोमांचक मुकाबला फारबिसगंज मध्ये झाला. येथे Congress चे उमेदवार मनोज विश्वास यांनी 221 मतांनी आघाडी घेत विजयी ठरले. विश्वास यांना 1,20,114 मते प्राप्त झाली, तर BJP चे विद्या सागर केशरी 1,19,893 मतांसह मागे राहिले. बोधगया मतदारसंघातही तितकीच टक्कर होती. येथे RJD चे कुमार सर्वजीत यांनी 881 मतांच्या अल्प फरकाने विजय मिळवला. सर्वजीत यांना 1,00,236 मते मिळाली, तर LJP (Ram Vilas) चे श्यामदेव पासवान 99,355 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले.
पाचवा तितकाच संघर्षपूर्ण निकाल बख्तियारपूर मतदारसंघात नोंदवला गेला. येथे LJP (Ram Vilas) चे अरुण कुमार (माजी मंत्री शत्रुघ्न साव यांचे पुत्र) यांनी 981 मतांनी बाजी मारली. त्यांना 88,520 मते मिळाली, तर RJD चे अनिरुद्ध कुमार 87,539 मतांवर थांबले. या पाचही मतदारसंघांत निवडणुकीचा थरार शिगेला पोहोचला व निकाल शेवटच्या क्षणापर्यंत अनिश्चित राहिला. संपूर्ण बिहारमध्ये यंदा BJP ने 89 जागा, तर JDU ने 85 जागा जिंकत NDA चे वर्चस्व पुन्हा सिद्ध केले. दुसरीकडे, RJD केवळ 25 जागांवर निवडून आल्याने महागठबंधनला मोठा धक्का बसला विशेषत: तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करूनही काही उपयोग झाला नाही.