Nitish Kumar: मोदी – शाहंच्या उपस्थितीत नितीश कुमार यांनी घेतली बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

26 मंत्र्यांचा समावेश असलेल्या या कॅबिनेटमध्ये BJP चे 14, JDU चे 7 आणि HAM, RLM तसेच LJP मधील मंत्री सामील झाले आहेत. नव्या सरकारकडून स्थैर्य आणि विकासाच्या मोठ्या अपेक्षा आहेत.

Nitish Kumar: मोदी – शाहंच्या उपस्थितीत नितीश कुमार यांनी घेतली बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

बिहारमध्ये आज नवीन सरकारची औपचारिक स्थापना झाली असून, राज्यात पुन्हा एकदा नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत इतिहास रचला आहे. नितीश कुमार यांनी तब्बल 10व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे, जी राज्याच्या राजकीय इतिहासातील एक मोठी घटना मानली जात आहे. राज्यपालांच्या उपस्थितीत झालेल्या या शपथविधी कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही उपस्थिती लावली.

नव्या सरकारमध्ये नितीश कुमार यांच्यासोबत 26 मंत्री सामील झाले आहेत. नव्या मंत्रिमंडळात BJP चे 14 मंत्री तर जेडीयू (JDU) चे 7 मंत्री असणार आहेत. यासोबतच हिंदुस्तानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) आणि राष्ट्रीय लोक मोर्चा या दोन पक्षांकडून प्रत्येकी एक मंत्री घेतण्यात आला आहे. हिंदुस्तानी अवाम मोर्चाचे अध्यक्ष जितन राम मांझी यांच्या पुत्र संतोष कुमार सुमन यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. तर, उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चाकडून त्यांचा मुलगा दीपक प्रकाश यांनी मंत्रीपद स्वीकारले.

हेही वाचा: SC On Bill Assent : राष्ट्रपती आणि राज्यपालांसाठी न्यायालय अंतिम मुदत ठरवू शकत नाही : सर्वोच्च न्यायालय

चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) मधूनही दोन मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. नव्या कॅबिनेटमध्ये काही नवीन चेहरेही झळकले. विशेषत: श्रेयसी सिंह या पहिल्यांदाच मंत्रीपदावर विराजमान होत आहेत. उपमुख्यमंत्री पदासाठी BJP कडून सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांनी शपथ घेतली असून दोघेही दुसऱ्यांदा या पदावर नियुक्त झाले आहेत.

नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातील नवीन मंत्र्यांची मुख्य यादी पुढीलप्रमाणे:

सम्राट चौधरी, विजय कुमार सिन्हा, विजय चौधरी, विजेंद्र प्रसाद यादव, सुनील कुमार, मोहम्मद जमा खान, संजय सिंह टायगर, अरुण शंकर प्रसाद, सुरेंद्र मेहता, नारायण प्रसाद, रमा निषाद, लखेंद्र कुमार रौशन, श्रेयसी सिंह, प्रमोद कुमार, संजय कुमार, संजय कुमार सिंह, दीपक प्रकाश, श्रवण कुमार, मंगल पांडे, दिलीप जायसवाल, अशोक चौधरी, लेसी सिंह, मदन सहनी, नितीन नवीन, रामकृपाल यादव, संतोष सुमन

नव्या सरकारसोबत आता बिहारच्या प्रशासनाकडून विकास आणि स्थैर्याबाबत मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. राज्यातील पुढील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.

हेही वाचा: Pakistan Cricket Board: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा बालिशपणा पुन्हा समोर; घेतलेला कठोर निर्णय शांतपणे मागे घेतला

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number