पत्नीला शिवी दिल्याने बापाचा काटा काढला! ‘दृश्यम’ पाहून रचला भयंकर कट; मास्टरमाईंड अखेर अटकेत

Crime News : बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातून माणुसकीला हादरवणारी घटना समोर आलेली आहे. चित्रपटातील स्टाईलने चक्क एका मुलानेच आपल्याच वडिलांचा जीव घेतला आहे.
जमिनीच्या वादातून मुलानेच बापाला संपवलं
Son Kills Father Drishyam-Style

बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातून माणुसकीला हादरवणारी घटना समोर आलेली आहे. चित्रपटातील स्टाईलने चक्क एका मुलानेच आपल्याच वडिलांचा जीव घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हसनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दरबां गावात रघुवीर सहनी यांची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्यांचाच मुलगा शिवशंकर याला अटक केलेली आहे. जो आरोपी सूरतमध्ये आपल्या कुटुंबासह राहत होता.

हेही वाचा-गजबजलेल्या बालिकाश्रम रोडवर रक्तरंजित घटना! 55 वर्षीय व्यक्तीवर हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू

जाणून घ्या हत्येचे कारण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमिनीच्या वादामधून आणि पत्नीला शिवीगाळ केल्याच्याच रागातून शिवशंकरने हे धक्कादायक पाऊल उचलले आहे. त्याच्या पत्नीने सांगितले होते की, सासरे रघुवीर यांनी तिला शिव्या दिल्या होत्या. याच गोष्टीचा राग मनात धरत त्याने स्वत:च्या वडिलांना संपवण्याचा प्लॅन बनवला. अजय देवगणचा ‘दृश्यम’ चित्रपट पाहून त्याने संपूर्ण हत्येचा कट रचला होता.

असा रचला कट
आरोपीने पोलिसांना वारंवार चकवा देण्यासाठी दृश्यम चित्रपटातील आयडिया वापरली. यो योजनेनुसार तो सूरतहून ट्रेनने बिहारला आला. पाटणा-हाजीपूर मार्गे तो पटोरी या स्थानकावर उतरला. तिथून तो ऑटोने काही अंतर गेला आणि नंतर तो 4 किमी पायी चालत रात्रीच्या अंधारात गावात पोहोचला. 26 जुलैच्या मध्यरात्री तो मागच्या दाराने घरात घुसला आणि त्याने कोठारातील कुऱ्हाड उचलली. बाहेर झोपलेल्या वडिलांवर वार केले. वडिलांची हत्या करताच तो त्याच रात्री पसार होत सूरतला पळून गेला.

एक फोन कॉल आणि पोलिसांनी लावला छडा
पुरावा न सोडण्याचा प्रयत्न करुनही एका चुकीमुळे आरोपी मुलगा शेवटीच अडकलाच. पोलिसांच्या ताब्यात येऊ नये म्हणून त्याने आपला मोबाईल बंद ठेवला होता. मात्र पटोरी स्थानकावर पोहोचल्यानंतर पत्नीला कॉल करण्यासाठी त्याने काही वेळ मोबाील सुरु केला. तांत्रिक तपासात त्याच रात्री त्याचे लोकेशन हे पटोरीत असल्याचे समोर आले आणि 36 तासांनंतर सूरतमध्ये दिसले. शिवाय वडिलांच्या मृत्यूनंतर मुलगा श्राद्धालाही आला नाही, त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. अखेर पोलिसांनी सूरतमध्ये जात आरोपी मुलाला अटक केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version