Sunday, April 20, 2025 04:45:13 AM

भाजप खासदाराच्या वक्तव्याने खळबळ

महाराष्ट्रात आधीच औरंगजबच्या कबरीवरून राजकारण तापल्याच पाहायला मिळतंय. कालच नागपूरमध्ये महाल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव पाहायला मिळाला. भाजपच्या एका खासदाराच्या वक्तव्याने खळबळ.

भाजप खासदाराच्या वक्तव्याने खळबळ

महाराष्ट्रात आधीच औरंगजबच्या कबरीवरून राजकारण तापल्याच पाहायला मिळतंय. कालच नागपूरमध्ये महाल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव पाहायला मिळाला. त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि आता नागपूरमध्ये तणावपूर्ण शांतात पाहायला मिळतेय. त्यातच आता पुन्हा एकदा भाजपच्या एका खासदाराच्या वक्तव्याने खळबळ माजल्याचा पाहायला मिळतंय. ओडिशातील बारगढ येथील भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांनी संसदेत हे वक्तव्य केलंय. पंतप्रधान मोदी हे गेल्या जन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते. असं वक्तव्य भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांनी संसदेत केलंय. 

हेही: Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कुठे चालणार?

काय आहे खळबळजनक वक्तव्य? 

पंतप्रधान मोदी हे गेल्या जन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते. पुरोहित यांच्या या विधानामुळे संसदेपासून ते सोशल मीडियावर एकच खळबळ उडालेली पाहायला मिळत आहे.पुरोहित यांनी एका साधूशी झालेल्या भेटीची आठवण सांगितली. ज्यांनी त्यांना सांगितले होते की, पंतप्रधान मोदी हे त्यांच्या मागील जन्मात छत्रपती शिवाजी महाराज होते. या दाव्याचे स्पष्टीकरण देताना खासदारांनी असे प्रतिपादन केले की पंतप्रधान मोदी हे खरोखरच शिवाजी महाराज आहेत, ज्यांनी महाराष्ट्र आणि देशाला प्रगती आणि विकासाकडे नेण्यासाठी पुनर्जन्म घेतला आहे.

हे विधान काही काँग्रेस नेत्यांना आणि नेटिझन्सना पसंत पडलेलं नाही. त्यांनी ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाचा आणि महानतेचा अपमान असल्याचं म्हणत टीका केली. अनेकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आणि ही तुलना आदरणीय ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचा अनादर करणारी असल्याचं म्हटलं आहे. काहींनी खासदारांना यासाठी माफी मागण्यास सांगितलं आहे. दरम्यान खासदार प्रदीप पुरोहित यांच्या वक्तव्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून खासदारांनी माफी मागावी अशी मागणी जोर धरू लागलीय. त्यामुळे आता हे प्रकरण नेमकं काय वळण घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणारे. 


सम्बन्धित सामग्री