PM Modi on BJP Victory Claim: ‘5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजप विजयाची हॅट्ट्रिक साधणार…’; बंगालमधील मतदानादरम्यान पंतप्रधान मोदींचा दावा

सध्या पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप) विजयाची 'हॅट्ट्रिक' साधेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

PM Modi on BJP Victory Claim: ‘5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजप विजयाची हॅट्ट्रिक साधणार…’; बंगालमधील मतदानादरम्यान पंतप्रधान मोदींचा दावा

PM Modi on BJP Victory Claim: उत्तर प्रदेशातील हरदोई येथे बुधवारी एका भव्य निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा राजकीय दावा केला आहे. सध्या पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप) विजयाची 'हॅट्ट्रिक' साधेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हरदोई जिल्ह्यातील मल्लावन येथे 'गंगा एक्सप्रेसवे'च्या उद्घाटनानंतर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी बिहारमधील एनडीएच्या ऐतिहासिक विजयाची आठवण करून देत भाजपच्या वाढत्या जनधाराचा उल्लेख केला.

गुजरातच्या विजयाचा दाखला आणि 'विकसित भारता'चा संकल्प
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात नुकत्याच जाहीर झालेल्या गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांचा दाखला दिला. ते म्हणाले, "गुजरातमध्ये महानगरपालिका, नगरपालिका आणि पंचायतींच्या निवडणुकांमध्ये 80 ते 85 टक्के जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. हाच कल पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही पाहायला मिळेल." या पाच राज्यांतील विजयाची 'हॅट्ट्रिक' ऐतिहासिक असेल, असे सांगत त्यांनी नमूद केले की, 4 मे रोजी जाहीर होणारे निकाल 'विकसित भारत' घडवण्याच्या संकल्पाला अधिक बळ देतील.

बंगालमध्ये निर्भय मतदान; लोकशाहीच्या उत्सवात मोठा सहभाग
पश्चिम बंगालमध्ये 142 विधानसभा जागांसाठी सध्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान सुरू आहे. यावर भाष्य करताना पंतप्रधान म्हणाले की, गेल्या 6 ते 7 दशकांत पहिल्यांदाच बंगालमधील जनता कोणत्याही भीतीशिवाय आणि निर्भय वातावरणात मतदान करत आहे. सोशल मीडियावरील मतदान केंद्रांच्या लांबच लांब रांगांची छायाचित्रे हे बळकट होत असलेल्या लोकशाहीचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. बंगालच्या जनतेने दाखवलेल्या या जागरूकतेबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

हेही वाचा – Raghav Chadha BJP Entry : राघव चड्ढांच्या भाजप प्रवेशामागे प्रियांका चोप्रा? 'या'साठी केली मध्यस्थी; नवजोत कौर सिद्धूंचा खळबळजनक दावा

मतदारांना घराबाहेर पडण्याचे आवाहन
मतदान प्रक्रिया पूर्ण होण्यास काही तास शिल्लक असताना पंतप्रधानांनी बंगालच्या मतदारांना मोठ्या संख्येने बाहेर पडण्याचे आवाहन केले. "हा लोकशाहीचा पवित्र उत्सव आहे आणि प्रत्येक मत देशाच्या संविधानाला बळकटी देणारे आहे," असे मोदी यांनी नमूद केले. पहिल्या टप्प्याप्रमाणेच दुसऱ्या टप्प्यातही मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे सांगत त्यांनी भाजपच्या विजयाबद्दल पूर्ण खात्री व्यक्त केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number