Monday, February 10, 2025 12:08:01 PM

Bomb threats to 2 major schools in Indore
Indore School Bomb Threats: इंदूरमधील 2 मोठ्या शाळांना बॉम्बच्या धमक्या, शोध मोहीम सुरू

हे ईमेल तामिळनाडूहून पाठवले गेले होते आणि ते तामिळमध्ये लिहिलेले होते. यासंदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी बॉम्बशोधक पथक पोहोचले.

indore school bomb threats इंदूरमधील 2 मोठ्या शाळांना बॉम्बच्या धमक्या शोध मोहीम सुरू
Indore School Bomb Threats
Edited Image

Indore School Bomb Threats: मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी असलेल्या इंदूरमधील दोन प्रमुख शाळांना मंगळवारी बॉम्बस्फोटाच्या धमक्या मिळाल्या. एनडीपीएस आणि आयपीएस शाळेच्या मुख्याध्यापकांना ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली. हे ईमेल तामिळनाडूहून पाठवले गेले होते आणि ते तामिळमध्ये लिहिलेले होते. यासंदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी बॉम्बशोधक पथक पोहोचले. मात्र, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.

दरम्यान, शाळांना बॉबस्फोटोची धमकी मिळाल्यानंतर लगेचचं शाळा व्यवस्थापनाने शाळा रिकामी केली. विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले आहे. पोलिस आता ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. इंदूर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बॉम्ब निकामी पथकाने दुपारी 1:30 वाजता इंदूरमधील दिगंबर पब्लिक स्कूलवरची तपासणी केली. पोलिसांनी सांगितले की, शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली होती. बॉम्ब पथकाने त्याच कारणासाठी प्रथम दोरावल पब्लिक स्कूलची झडती घेतली. कारण या शाळेलाही अशाच प्रकारे बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती.


तमिळ भाषेत मिळाले धमकीचे ईमेल - 

इंदूर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आज सकाळी 5:53 वाजता, दिगंबर पब्लिक स्कूल आणि दोरावल पब्लिक स्कूलला तमिळ भाषेत ईमेल मिळाले, ज्यात असे म्हटले होते की दुपारी 1:45 वाजण्यापूर्वी दोन्ही शाळांमध्ये बॉम्बस्फोट होऊ शकतात. धमकीनंतर दोन्ही शाळांमध्ये शोध मोहीम सुरू आहे. दोन्ही मेल शाळेच्या मुख्याध्यापकांच्या ईमेलवर आले आहेत. 

गाझियाबादमधील शाळेला हायड्रोजन बॉम्बने उडवून देण्याची धमकी - 

दरम्यान, आजच गाझियाबादमधील एका शाळेला हायड्रोजन बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. शालीमार गार्डनमधील सेंट मेरी ख्रिश्चन स्कूलला पाठवलेल्या ईमेलमध्ये असे लिहिले होते की शाळेत हायड्रोजन बॉम्ब ठेवण्यात आला आहे. सकाळी 9 वाजता ईमेल मिळाला. धमकीच्या ईमेलनंतर शाळा व्यवस्थापनाने मुलांना बाहेर काढले आणि पोलिसांना बोलावले. सुमारे दीड तास शाळेची झडती घेण्यात आली, पण याठिकाणी कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. 
 


सम्बन्धित सामग्री