विमान प्रवास पुन्हा महागला! इंडिगोकडून फ्युएल सरचार्जमध्ये वाढ; मात्र, या प्रवाशांना दिलासा

यामुळे परदेश प्रवासाचे नियोजन करणाऱ्या नागरिकांना आता तिकिट खर्चाचा नव्याने हिशोब करावा लागणार आहे. अंतर आणि प्रवासाच्या स्वरूपानुसार या अतिरिक्त शुल्काचा फरक पडणार आहे.

विमान प्रवास पुन्हा महागला! इंडिगोकडून फ्युएल सरचार्जमध्ये वाढ;  मात्र, या प्रवाशांना दिलासा
indigo

IndiGo Fuel Surcharge Hike: विमान इंधनाच्या (ATF) दरात प्रति लिटर तब्बल 16 रुपयांनी मोठी वाढ झाल्यामुळे विमान कंपन्यांचा प्रवास खर्च प्रचंड वाढला आहे. या दरवाढीचा थेट फटका प्रवाशांना बसला असून इंडिगो एअरलाइन्सने देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी ‘फ्युएल सरचार्ज’ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 6 ऑक्टोबर 2026 च्या मध्यरात्री 12:01 वाजेपासून लागू करण्यात आलेल्या या नव्या निर्णयानुसार आता नवीन बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना वाढीव तिकिट दर मोजावे लागणार आहेत. गेल्या सहा महिन्यांतील ही तिसरी दरवाढ असल्याने आगामी सणासुदीच्या काळात प्रवास करणाऱ्या नागरिकांचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.

आधी बुकिंग केलेल्या प्रवाशांना दिलासा; नागपूरहून प्रमुख मार्गांवर दर वाढले
इंडिगोने स्पष्ट केले आहे की ही दरवाढ केवळ नवीन बुकिंग करणाऱ्या प्रवाशांसाठीच लागू असेल, त्यामुळे ज्या प्रवाशांनी आधीच तिकिटे बुक केली आहेत त्यांच्यावर या वाढीव फ्युएल सरचार्जचा कोणताही परिणाम होणार नाही. नागपूरहून मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू आणि कोलकाता यांसारख्या प्रमुख शहरांकडे जाणाऱ्या मार्गांवर तिकिटांचे भाव वाढले आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार नागपूर-हैदराबाद प्रवासाचे भाडे 7,401 रुपयांवरून 8,270 रुपये झाले आहे, तर नागपूर-मुंबई मार्गावरील दर 6,340 रुपयांवरून 6,499 रुपये आणि नागपूर-दिल्ली प्रवासाचे भाडे 6,843 रुपयांवरून 7,158 रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

हेही वाचा – PM किसान योजनेतील मोठा गैरप्रकार उघड; एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींनी घेतला लाभ, संशयास्पद प्रकरणांची यादी तयार! आता..

आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर 2500 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त सरचार्ज

देशांतर्गत मार्गांवर फ्युएल सरचार्जमध्ये प्रत्यक्ष वाढ 100 ते 350 रुपये झाली असताना, आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांना मात्र या दरवाढीचा सर्वात मोठा दणका बसणार आहे. एप्रिल महिन्यात जाहीर केलेल्या दरांच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी प्रति सेक्टर तब्बल 2,500 रुपयांपर्यंत फ्युएल सरचार्ज वाढवण्यात आला आहे. यामुळे परदेश प्रवासाचे नियोजन करणाऱ्या नागरिकांना आता तिकिट खर्चाचा नव्याने हिशोब करावा लागणार आहे. अंतर आणि प्रवासाच्या स्वरूपानुसार या अतिरिक्त शुल्काचा फरक पडणार आहे.

दसरा आणि दिवाळीच्या काळात तिकिट दर 20 हजार पार जाण्याची शक्यता

दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची मागणी प्रचंड वाढल्याने ट्रॅव्हल एजंट्सनी तिकिट दरांमध्ये आणखी मोठी वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे. आठवड्याच्या शेवटी काही प्रमुख देशांतर्गत मार्गांवरील तिकिट दर 15,000 रुपयांच्या पुढे जाण्याची चिन्हे आहेत, तर ऐन सणाच्या काळात हेच दर 20,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. एटीएफ दरवाढ आणि सणांचा हंगाम या दोन्ही घटकांमुळे आगामी काळात विमान प्रवास अधिक महागडा ठरणार आहे.

हेही वाचा – सरकारी कर्मचाऱ्यांसाठी HRA चे नियम अधिक कडक; पगारात वाढ की घट? करसवलत आणि घरभाडे भत्त्याबाबत केंद्राचे महत्त्वाचे निर्देश

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number