Appliances Price Hike: एसी, फ्रिज अन् वॉशिंग मशीन खरेदी महागणार; 1 ऑक्टोबरपासून नवीन दरपत्रक लागू

येत्या 1 ऑक्टोबर 2026 पासून टीव्ही, एअर कंडिशनर (AC), रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन यांसारख्या दैनंदिन वापरातील वस्तूंच्या दरात थेट 5 ते 8 टक्क्यांची वाढ होणार आहे.
consumer electronics price hike
सर्वसामान्यांना महागाईचा झटका, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमतीत वाढ

Appliances Price Hike: आगामी सणांच्या दिवसांत नवीन इलेक्ट्रॉनिक्स तसेच होम अप्लायन्सेस खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मध्यमवर्गीय ग्राहकांच्या बजेटचे गणित पार बिघडणार आहे. येत्या 1 ऑक्टोबर 2026 पासून टीव्ही, एअर कंडिशनर (AC), रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन यांसारख्या दैनंदिन वापरातील वस्तूंच्या दरात थेट 5 ते 8 टक्क्यांची वाढ होणार आहे. उत्पादन खर्चात सातत्याने होणारी प्रचंड वाढ सहन करणे कठीण झाल्यामुळे ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक कंपन्यांनी हा कटू निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, चालू 2026 या एकाच वर्षातील ही सलग 3री दरवाढ असून, सणासुदीच्या ऐन उत्साहातच महागाईचा हा फटका बसल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.

मालवाहतूक महागल्याने कंपन्यांवर आर्थिक ताण

इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किमतीत अचानक झालेल्या या वाढीमागे आंतरराष्ट्रीय पातळीवरील अस्थिरता आणि राजकीय घडामोडी मुख्यत्वे कारणीभूत ठरल्या आहेत. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे तांबे, स्टील, ॲल्युमिनियम तसेच प्लास्टिक निर्मितीसाठी लागणाऱ्या घटकांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यासोबतच जागतिक सागरी मालवाहतूक शुल्कात (Freight Charges) झालेली मोठी वाढ आणि परकीय चलनातील चढ-उतार यांमुळे कंपन्यांचा उत्पादन खर्च कमालीचा वाढला आहे. आपला घटणारा नफा सावरण्यासाठी उत्पादक कंपन्यांनी हा वाढीव आर्थिक भार थेट ग्राहकांच्या माथी मारण्याचे धोरण स्वीकारले आहे.

हेही वाचा – Central Railway: आता दिवाळी, छठपूजेसाठी मध्य रेल्वेच्या स्पेशल 418 गाड्या धावणार; गाड्यांचे वेळापत्रक जाणून घ्या….

एसी अन् फ्रीझर सर्वाधिक महागणार

उद्योग क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवीन दरांचा सर्वाधिक फटका एअर कंडिशनर्स आणि डीप फ्रीझर्स खरेदी करणाऱ्यांना बसणार असून यांच्या किमती 5 ते 8 टक्क्यांनी वाढणार आहेत. तर दुसरीकडे वॉशिंग मशीन, टीव्ही आणि फ्रिजच्या दरांमध्ये 3 ते 5 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. गेल्या वर्षीच्या सणासुदीच्या कालावधीच्या तुलनेत वस्तूंच्या मूळ किमतीत जवळपास 15 टक्क्यांपर्यंतचा फरक पडला असला, तरी सध्या लागू असलेल्या जीएसटी सवलतींमुळे प्रत्यक्ष खरेदी करताना ग्राहकांवर केवळ 5 टक्क्यांपर्यंतच निव्वळ प्रभाव जाणवेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version