Toll Plaza New Rule: टोल नाक्यांच्या नियमात होणार मोठे बदल; 10 एप्रिलपासून कॅशही चालणार नाही आणि…

प्रत्येक वाहनावर 'FASTag' असणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. या डिजिटल प्रणालीमुळे टोलचे पैसे आपोआप वजा होतील, ज्यामुळे प्रवासाचा वेग वाढण्यास मदत होणार आहे.<br/>

Toll Plaza New Rule: टोल नाक्यांच्या नियमात होणार मोठे बदल; 10 एप्रिलपासून कॅशही चालणार नाही आणि…

Toll Plaza New Rule: राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने टोल वसुलीच्या नियमांत मोठे बदल करण्याची घोषणा केली असून, 10 एप्रिलपासून टोल नाक्यांवर रोख रक्कम (कॅश) स्वीकारणे पूर्णपणे बंद केले जाणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांच्या खिशावर परिणाम होणार असून, प्रवास करण्याच्या पद्धतीतही मोठे बदल होणार आहेत.

रोख व्यवहारांवर बंदी; FASTag अनिवार्य
टोल नाक्यांवरील वाहनांच्या लांबच लांब रांगा कमी करण्यासाठी आणि प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी सरकारने हा कठोर निर्णय घेतला आहे. नव्या नियमानुसार, देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर आता रोख स्वरूपात टोल कर भरता येणार नाही. प्रत्येक वाहनावर 'FASTag' असणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. या डिजिटल प्रणालीमुळे टोलचे पैसे आपोआप वजा होतील, ज्यामुळे प्रवासाचा वेग वाढण्यास मदत होणार आहे.

UPI ने पैसे भरल्यास 1.25 पट भुर्दंड
ज्या वाहनांवर FASTag नसेल, अशा वाहनधारकांसाठी UPI द्वारे पैसे भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, यासाठी प्रवाशांना नेहमीच्या टोल शुल्काच्या 1.25 पट (सव्वापट) अधिक रक्कम मोजावी लागेल. म्हणजेच, तांत्रिकदृष्ट्या FASTag शिवाय महामार्गावर उतरणे आता अधिक महाग पडणार आहे. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने हा दंड लागू केला आहे.

नियम मोडल्यास दुप्पट दंड आणि ई-नोटीस
जर एखाद्या चालकाने FASTag वापरला नाही किंवा टोल भरण्यास नकार दिला, तर अशा वाहनांवर कठोर कारवाई केली जाईल. अशा वाहनांना महामार्गावरून बाहेर काढले जाऊ शकते किंवा त्यांना प्रवेश नाकारला जाऊ शकतो. याशिवाय संबंधित वाहन मालकाला 'ई-सूचना' (e-notice) पाठवली जाईल. ही सूचना मिळाल्यानंतर 3 दिवसांच्या आत पैसे न भरल्यास, नेहमीच्या टोलच्या दुप्पट रक्कम दंडासह भरावी लागेल.

हेही वाचा – Dharashiv ZP Education Drive: भोंगा वाजणार आणि टीव्ही-मोबाईल बंद होणार; विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा नवीन ‘पॅटर्न’, नेमकं प्रकरण काय?

ओळखपत्र दाखवून माफी मिळवणे आता कठीण
फसवणुकीने टोल माफी मिळवणाऱ्यांच्या विरोधातही नियमांचा फास आवळला आहे. आता केवळ ओळखपत्र दाखवून टोलमधून सूट मिळणार नाही. टोल माफीसाठी पात्र असलेल्या व्यक्तींना आता 'माफी प्राप्त FASTag' (Exempted FASTag) किंवा वार्षिक पास घेणे अनिवार्य असेल. खाजगी वाहनधारकांसाठी 3,075 रुपयांचा वार्षिक पास उपलब्ध असून, त्यात वर्षाला 200 वेळा टोल ओलांडण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे नियमित प्रवाशांची मोठी बचत होऊ शकते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number