CCPA ने Zepto, IndiGo सह 9 नामांकित ॲप्सना ठोठावला 20 लाख रुपयांचा दंड; धक्कादायक कारण समोर

ग्राहकांची दिशाभूल करून अतिरिक्त पैसे उकळणाऱ्या 9 नामांकित ॲप्सवर एकूण 20 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती सरकारने राज्यसभेत दिली.<br/>

CCPA ने Zepto, IndiGo सह 9 नामांकित ॲप्सना ठोठावला 20 लाख रुपयांचा दंड; धक्कादायक कारण समोर

Dark Patterns :  ऑनलाइन खरेदी किंवा तिकीट बुकिंग करताना स्क्रीनवर दिसणाऱ्या मूळ किमतीत छुपे शुल्क जोडून ग्राहकांना आर्थिक भुर्दंड देणाऱ्या कंपन्यांवर सरकारने कडक पाऊल उचलले आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर वापरल्या जाणाऱ्या 'डार्क पॅटर्न्स' (दिशाभूल करणाऱ्या डिझाइन पद्धती) विरोधात 'सेंट्रल कंझ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी'ने (CCPA) कारवाईचा बडगा उगारला आहे. ग्राहकांची दिशाभूल करून अतिरिक्त पैसे उकळणाऱ्या 9 नामांकित ॲप्सवर एकूण 20 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती सरकारने राज्यसभेत दिली.

अनुचित व्यापारी पद्धतींवर नियामकांचे ताशेरे

ग्राहकांना सुरुवातीला कमी किंमत दाखवून अंतिम पेमेंटच्या वेळी हँडलिंग फी, सक्तीची वर्गणी किंवा डोनेशन जोडण्याच्या प्रकारांना सीसीपीएने गांभीर्याने घेतले आहे. क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्म 'Zepto' वर ग्राहकांना नकळत सदस्यत्व शुल्क आणि प्रक्रिया शुल्क जोडल्याप्रकरणी (बास्केट स्नीकिंग व ड्रिप प्राइसिंग) 7 लाख रुपयांचा दंड ठोठावला गेला. त्याचप्रमाणे, 'BookMyShow' ला तिकीट काढताना आधीच सिलेक्ट केलेले 1 रुपयाचे धर्मादाय योगदान काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले.

हेही वाचा – Online Liquor Sale : मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! आता ऑनलाइन बुक करता येणार दारू, कुठे सुरू झाली सुविधा?

विविध ॲप्सवर कारवाई आणि एकूण 20 लाख रुपयांचा दंड वसूल

या मोहिमेअंतर्गत Zepto, BookMyShow, IndiGo आणि PhysicsWallah यांच्यासह FirstCry, PharmEasy, McAfee, SpiceJet आणि Anuj Jindal यांसारख्या प्लॅटफॉर्म्सचा समावेश आहे. या कंपन्यांवर 1 लाख ते 3 लाख रुपयांपर्यंतचा दंड लादण्यात आला आहे. ग्राहकांना खोटी तातडी दाखवणारे काऊंटडाऊन टायमर्स आणि छुपे शुल्क यांसारख्या फसव्या क्लृप्त्या बंद करण्याचे निर्देश देण्यात आले असून, आतापर्यंत या कारवाईतून सुमारे 20 लाख रुपयांचा महसूल प्राधिकरणाने वसूल केला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number