Tuesday, February 17, 2026 04:51:10 PM

Student Group Clash : विद्यापीठात 'खुर्ची युद्ध'! कॅन्टीनमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटात राडा; लाथा-बुक्क्यांनी एकमेकांना तुडवलं, कुठे घडली घटना?

या राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, यात विद्यार्थी एकमेकांवर खुर्च्या फेकून मारताना आणि लाथा-बुक्क्यांनी प्रहार करताना दिसत आहेत.

student group clash  विद्यापीठात खुर्ची युद्ध कॅन्टीनमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटात राडा लाथा-बुक्क्यांनी एकमेकांना तुडवलं कुठे घडली घटना

Student Group Clash : विद्यापीठाच्या कॅन्टीनमध्ये क्षुल्लक कारणावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. या राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, यात विद्यार्थी एकमेकांवर खुर्च्या फेकून मारताना आणि लाथा-बुक्क्यांनी प्रहार करताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशातील एका प्रसिद्ध विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये शिक्षणाऐवजी हिंसाचाराचा नंगानाच पाहायला मिळाला. 

शांत कॅन्टीनचे रूपांतर युद्धभूमीत

प्राप्त माहितीनुसार, व्हायरल व्हिडिओमध्ये सुरुवातीला कॅन्टीनमध्ये सर्व काही शांत दिसते. विद्यार्थी जेवणाचा आनंद घेत असताना अचानक एका कोपऱ्यातून जोरात ओरडण्याचा आवाज येतो. त्यानंतर एका गटाने दुसऱ्या गटावर अचानक हल्ला चढवला. काही क्षणातच हाताला लागेल त्या वस्तूने, विशेषतः कॅन्टीनमधील खुर्च्यांनी एकमेकांना मारहाण सुरू झाली.

जीवाच्या आकांताने विद्यार्थ्यांची पळापळ

या हाणामारीमुळे संपूर्ण कॅन्टीनमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. भांडण इतके विकोपाला गेले की, विद्यार्थ्यांनी थेट फूड काउंटरवरही हल्ला केला. हा प्रकार पाहून तिथे उपस्थित असलेले इतर विद्यार्थी जीवाच्या आकांताने इकडे-तिकडे धावताना दिसले. "त्याला मारा, पकडा त्याला!" अशा किंकाळ्यांनी संपूर्ण परिसर हादरून गेला होता. काही विद्यार्थ्यांनी हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला, मात्र हिंसाचार वाढल्याने त्यांनाही तिथून पळ काढावा लागला.

हेही वाचा - Crime News : निळी पेटी उघडताच पोलिसांनाही घाम फुटला, दुसऱ्या पत्नीच्या साथीने रामसिंगने प्रेयसीचा काटा काढला; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावर तीव्र संताप
हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. 'शिक्षणाच्या मंदिरात अशा प्रकारे गुंडगिरी चालते का?' असा सवाल विचारला जात आहे. एका यूजरने लिहिले आहे की, "अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे संपूर्ण कॅम्पस आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांची बदनामी होते." दुसऱ्याने म्हटलं आहे की, "पालक मुलांना शिकण्यासाठी पाठवतात आणि मुले इथे खुर्च्यांनी एकमेकांचे डोके फोडत आहेत." या घटनेमुळे विद्यापीठ प्रशासनाच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अद्याप याप्रकरणी विद्यापीठ किंवा पोलिसांनी कोणती अधिकृत कारवाई केली आहे, याची माहिती समोर आलेली नाही.
 


सम्बन्धित सामग्री