Chhagan Bhujbal On PM Modi Statement : ‘एकदम पहिल्यासारखी परिस्थिती होणे कठीण’, छगन भुजबळ यांच इंधन तुटवड्यावर भाष्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केलेल्या आवाहनानंतर छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

Chhagan Bhujbal On PM Modi Statement : ‘एकदम पहिल्यासारखी परिस्थिती होणे कठीण’, छगन भुजबळ यांच इंधन तुटवड्यावर भाष्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच केलेल्या काही आवाहनांमुळे देशातील सामान्य नागरिकांपासून ते गुंतवणूकदारांपर्यंत सर्वांमध्येच अस्वस्थता निर्माण झाली आहे. पुढील 1 वर्ष सोने खरेदी टाळणे, परदेश दौरे रद्द करणे आणि पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करणे अशा प्रकारची आवाहने पंतप्रधानांनी केल्याने आर्थिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील नेते छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे सांगितलं आहे त्याचा नक्कीच विचार व्हायला हवा. आपण इथे सगळ्या देशांचा अभ्यास करुन माहिती घेतली आहे. यापूर्वी कितीतरी पटीने भाववाढ झालेली आहे. पेट्रोल-डिझेल भाववाढ हे सगळं तुम्ही रिपोर्टिंग करत होता. ⁠ही परिस्थिती आपण निर्माण केलेली नाही जे देश पेट्रोलवर अवलंबून आहे तिथे झालेली आहे. याचे परिणाम सर्वांवरच होत आहे. होर्मूजच्या खाडीत जे काही सुरू आहे त्यावरच पुढील गोष्टी अवलंबून आहेत. तिथे सर्व काही सुरळीत झालं तर काही अडचणी येणार नाहीत. मोदींनी दिलेला संदेश सर्वांसाठी आहे.थोडं काटकसरीने धोरण सर्वांनी ठेवायला हवं” दरम्यान राज्यात सध्या इंधनाचा किती साठा शिल्लक आहे, याची आकडेवारी देखील यावेळी भुजबळ यांनी सादर केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number