CJP Vijeta Dahiya : सीजेपीच्या प्रवक्त्याला ‘तो’ व्हिडीओ महागात पडला! कॉकरोच जनता पार्टीकडून मोठी कारवाई

नीट पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन सुरू आहे. असं असताना सीजेपीचे प्रवक्ते विजेता दहिया यांच्यावर सीजेपीने मोठी कारवाई केली आहे.

CJP Vijeta Dahiya : सीजेपीच्या प्रवक्त्याला ‘तो’ व्हिडीओ महागात पडला! कॉकरोच जनता पार्टीकडून मोठी कारवाई

नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळतो आहे, यात अनेक राजकारणी आणि अभिनेते-अभिनेत्रींनीही आपला सहभाग दाखवायला सुरुवात केली आहे. सीजेपीच्या मोर्च्यादरम्यान लाखो हजारो विद्यार्थी गेल्या कित्येक दिवसांपासून उपासमार करत या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. असं असताना सीजेपीचे प्रवक्ते विजेता दहिया यांच्यावर सीजेपीने मोठी कारवाई केली आहे.

हेही वाचा- Jantar Mantar Protest: शरद पवारांनी गाठलं जंतर-मंतर मैदान; आंदोलक अभिजित दीपके यांच्याशी चर्चा करून सरकारवर डागली तोफ

विद्यार्थ्यांसाठी पुकारलेल्या या आंदोलनात सहभागी न होता गाडीत बसून बर्गर खाल्ल्याचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे त्यांची सीजेपीच्या प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी केली आहे. सीजेपीच्या या अचानक निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केले जातेय. सोमवारी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीने संसदेवर काढलेल्या मोर्चाला राजधानी दिल्लीसह देशात तीव्र प्रतिसाद मिळत होता. सोमवारी काढलेल्या मोर्चादरम्यान, मोर्चात सहभागी न होता बर्गर खायला गेलेले संघटनेचे प्रवक्ते विजेता दहिया यांच्यावर पक्षाने कारवाई करत त्यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी केली आहे. 

सीजेपीने काय निर्णय घेतला?
कॉकरोच जनता पार्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यावेळी कॉकरोच जनता पार्टीने म्हटलं की, “आमचे प्रवक्ते विजेता दहिया यांच्या अत्यंत असंवेदनशील कृतीचा आम्ही तीव्र निषेध करतो. शांततापूर्ण आंदोलक आणि आमची टीम पोलिसांच्या क्रूर हिंसेला सामोरे जात असताना त्यांचे व्हिडिओ समोर आले. असे वर्तन अस्वीकार्य आहे, सद्सद्विवेकबुद्धीचा संपूर्ण अभाव दर्शवते आणि आमच्या चळवळीच्या मूल्यांशी व तत्त्वांशी पूर्णपणे विसंगत आहे. याला प्रतिसाद म्हणून, आम्ही विजेता दहिया यांना ‘झुरळ जनता पार्टी’च्या प्रवक्ते पदावरून हटवत आहोत आणि त्यांना सर्व अधिकृत जबाबदाऱ्यांमधून मुक्त करत आहोत.” विजेता दहिया यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.   

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number