Crime : विवाहितेचं चुलत भावावर प्रेम जडलं! आधी कारमध्ये मायलेकीसोबत भयंकर कृत्य; नंतर उसाच्या शेतात नेऊन…

Crime News : माणुसकीला काळिमा फासणारी एक अतिशय धक्कादायक घटना समोर आलेली आहे. एका व्यक्तीने आपल्याच चुलत बहिणीची गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर तिची ओळख लपवण्यासाठी तिचा मृतदेह उसाच्या शेतात जाळून टाकलेला आहे.
Crime : विवाहितेचं चुलत भावावर प्रेम जडलं! आधी कारमध्ये मायलेकीसोबत भयंकर कृत्य; नंतर उसाच्या शेतात नेऊन…
चुलत भावावर प्रेम जडलं अन् विवाहितेचा घात झाला

Crime : माणुसकीला काळिमा फासणारी एक अतिशय धक्कादायक घटना समोर आलेली आहे. एका व्यक्तीने आपल्याच चुलत बहिणीची गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर तिची ओळख लपवण्यासाठी तिचा मृतदेह उसाच्या शेतात जाळून टाकलेला आहे. अत्यंत क्रूरपणे हत्या का करण्यात आली?, कौटुंबिक वाद होते की, प्रेमसंबंधांचा प्रकार होता, त्याबाबत सविस्तर माहिती समोर आलेली आहे.

घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील ही संपू्र्ण घटना आहे. आरोपीने आपल्या चुलत बहिणीची गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतरही तो शांत बसला नाही. त्याने तिचा मृतदेह उसाच्या शेतात जाळून टाकला होता. याच शेतात याच महिलेचा मृतदेह आणि तिच्या शेजारी रडत असलेली तीन वर्षांची जखमी चिमुकली आढळल्यानंतर या संपूर्ण भयानक गुन्हा सर्वांसमोर आला. काही वेळात या संपूर्ण घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच अनिल कुमार नावाच्या व्यक्तीने पोलिसांशी संपर्क साधला आणि मृत महिला ही आपली पत्नी उषा असल्याचे सांगितले तसेच जखमी चिमुकली आपलीच मुलगी असल्याचे पोलिसांना सांगितले. अनिल कुमारने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तातडीने तपास सुरु केला.

हेही वाचा-Crime : बाळाच्या जन्माआधीच काळजाचा ठोका चुकवणारी घटना! गरोदर पत्नीच्या पाठी पतीचे धक्कादायक कृत्य; 50 सीसीटीव्ही फुटेजने…

लग्नाच्या भेटीतून प्रेम फुललं
साधारण सहा महिन्यांपूर्वी एका कौटुंबिक कार्यक्रमात मृत महिला उषा आणि आरोपी म्हणजेच तिच्या काकांचा मुलगा नीरज यांची भेट झाली होती. काही दिवसांत आपल्याच काकांचा मुलगा असलेला नीरज सोबत तिचे प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यामुळे उषा पतीचे घर सोडून चांदपूरमधील सियाऊ शहरात भाड्याच्या घरात राहू लागली.

का केली हत्या?
पोलीस तपासादरम्यान, पोलिसांना नीरजबाबत संशय आला आणि त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. अखेर नीरजने केलेल्या हत्येबाबत पोलिसांसमोर कबूली दिली. समोर आलेले कारण ऐकून पोलीसही हादरुन गेले होते. कारण की, उषा ही त्याच्या पत्नीला घटस्फोट देऊन स्वत: सोबत राहण्यासाठी वारंवार दबाव टाकत होती. 19 सप्टेंबर रोजी तो उषा आणि तिच्या दोन मुलांना हरिद्वार आणि ऋषिकेशला फिरायला जाण्याच्या बहाण्याने घेऊन गेला होता. त्यानंतर 22 सप्टेंबरच्या रात्री नीरजने अलमपूर एदवा गावाजवळ आले असता गाडीतच उषासह तिच्या तीन वर्षांच्या मुलीचा गळा आवळला. त्यांना उसाच्या शेतात फेकून अंगावर ब्लँकेट टाकून निर्दयीपणे पेटवून दिले. मात्र, सुदैवाने आगीतून तीन वर्षांची चिमुकली बचावली.

हेही वाचा-Pune: विसर्जनाच्या गर्दीत मोबाईल चोरीचा धुमाकूळ; शिवाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई, 11 जण अटकेत

मुलासोबत काय केले?
दोघींना मारल्यानंतर नीरज उषाच्या दीड वर्षांच्या मुलाला स्वत:सोबत घरी घेऊन गेला आणि तो बेवारस सापडल्याचा बनाव घरच्यांना सांगितला. नीरजला स्वत:चा मुलगा नसल्याने तो त्याला घरी घेऊन गेला होता. 23 सप्टेंबरच्या सकाळी शेतात मृतदेह दिसून येताच घटना सर्वांसमोर आली, त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी मुलीला उपचारासाठी दाखल गेले. सध्या या प्रकरणी पोलिसांनी नीरजला अटक केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version