Cyclone Monda Update: आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडक देणाऱ्या चक्रीवादळ ‘मोंथा’मुळे वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली आहे. तीव्र वारे आणि मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विशाखापट्टणम, विजयवाडा आणि तिरुपती विमानतळांवरील एकूण 32 उड्डाणे रद्द, तर दक्षिण मध्य रेल्वे झोनमधील 120 गाड्यांची सेवा थांबवण्यात आली आहे.
विशाखापट्टणम विमानतळावर 32 उड्डाणे रद्द
विशाखापट्टणम विमानतळ संचालक एन. पुरुषोत्तमन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी एकूण 32 उड्डाणे पूर्णतः रद्द करण्यात आली. दररोज सरासरी 30 ते 32 देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे येथे सुरू असतात, मात्र आज सर्व उड्डाणे स्थगित करण्यात आली, असे त्यांनी सांगितले.
विजयवाडा विमानतळावर 16 उड्डाणे रद्द
विजयवाडा विमानतळ संचालक लक्ष्मीकांत रेड्डी यांनी सांगितले की, आज दिल्ली, मुंबईसह विविध शहरांकडे जाणारी 16 विमाने रद्द, तर 5 उड्डाणे कार्यान्वित करण्यात आली. काल फक्त एकच विमान रद्द करण्यात आले होते, मात्र आज हवामान विभागाच्या चेतावणीनंतर बहुतेक विमान कंपन्यांनी उड्डाणे स्थगित करण्याचा निर्णय घेतला, असे रेड्डी यांनी नमूद केलं.
हेही वाचा -Rajasthan Bus Tragedy: जयपूरमध्ये हाय-टेंशन लाइनला स्पर्श झाल्याने बस पेटली; दोघांचा मृत्यू, दहाहून अधिक जखमी
तिरुपती विमानतळावर चार विमाने रद्द
चक्रीवादळाच्या तीव्रतेमुळे तिरुपती विमानतळावरही चार उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. विमान कंपन्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने कामकाज तात्पुरते थांबवले आहे.
रेल्वे वाहतुकीवरही परिणाम; 120 गाड्या रद्द
केवळ विमानसेवाच नव्हे तर रेल्वे वाहतूकही चक्रीवादळ ‘मोंथा’मुळे ठप्प झाली आहे. दक्षिण मध्य रेल्वे (SCR) झोनमधील 120 गाड्या 27 ऑक्टोबरपासून मंगळवारपर्यंत रद्द करण्यात आल्या असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. तथापी, प्रवाशांना पर्यायी प्रवासाची सोय करण्यात येत असून, तात्पुरत्या वेळापत्रकानुसार गाड्यांची पुनर्बांधणी केली जात आहे.
हेही वाचा - Delhi Pollution Control: दिल्लीमध्ये 1 नोव्हेंबरपासून फक्त BS-VI कमर्शियल वाहनांचाच प्रवेश; हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी दिल्ली सरकार प्रयत्नशील
आंध्र किनाऱ्यावर ‘मोंथा’चा धोका कायम
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मंगळवारी संध्याकाळी किंवा रात्री ‘मोंथा’ चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विशाखापट्टणम, श्रीकाकुलम आणि विजयनगरम जिल्ह्यांमध्ये उच्च सतर्कता जाहीर करण्यात आली आहे. सागरी किनाऱ्यावर मच्छीमारांना पुढील 48 तास समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.